अमेरिकी वेब सीरिज 'गेम ऑफ थ्रोन्स'चा शेवटचा भाग नुकताच प्रसारीत झाला. या सीरिजमधील लोखंडाचे सिंहासनाला रुसी प्रशासनाने जप्त केले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हे सिंहासन अवैधरित्या लावले गेले आहे. जप्त केल्यानंतर सिंहासन गुप्त जागी ठेवण्यात आले आहे. प्रशासन या शोच्या निर्मात्यांना सिंहासन परत करणार की नाही,हे अद्याप समजू शकलेले नाही.
गेम ऑफ थ्रोन्सच्या निर्माते म्हणाले की, 'सिंहासन जप्त केल्यामुळे आमच्या शोवर काहीच फरक पडला नाही. कारण शूटिंग आधीच पार पडले होते. हे सिंहासन सेंट पीटर्सबर्ग शहरातील मुख्य चौकात लावले होते. तिथे लोक त्या सिंहासनासोबत फोटो काढायचे. सेंट पीटर्सबर्ग राजेशाही काळात राजधानी होती.'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील 'गेम ऑफ थ्रोन्स' वेबसीरिज आवडते. २०१६ मध्ये अमेरिकेतील निवडणुकीत रुसीच्या हस्तक्षेपामुळे रॉबर्ट मूलर समितीकडून क्लीनचीट मिळाली होती. त्यानंतर ट्रंप यांनी गेम ऑफ थ्रोन्स स्टाईलमध्ये आपला फोटो ट्विटरवर शेअर केला होता. ज्यात त्यांनी गेम ओव्हर असे लिहिले होते. खरेतर सिंहासन जप्त केल्यानंतर शेवटचा भाग कसा प्रसारीत होणार, असा प्रश्न पडला होता. पण, चित्रीकरण पूर्ण झाल्यामुळे सिंहासन जप्त केल्याचा शोवर अजिबात परिणाम झाला नाही.