Join us

ओलीविया न्यूटन जॉन म्हणतेय, कॅन्सरने जगायला शिकविले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2017 10:37 PM

गायिका ओलीविया न्यूटन जॉनचे म्हणणे आहे की, कॅन्सरने मला जगायला शिकवले. ती म्हणतेय की, मी एका गोष्टीची आयुष्यभर ऋणी ...

गायिका ओलीविया न्यूटन जॉनचे म्हणणे आहे की, कॅन्सरने मला जगायला शिकवले. ती म्हणतेय की, मी एका गोष्टीची आयुष्यभर ऋणी राहणार आहे की, कॅन्सरमुळे तिच्या आयुष्यात ‘करुणा’ आली. ६८ वर्षीय गायिकेला दोन दशकाअगोदर समजले होते की, ती स्तन कॅन्सरने पीडित आहे. फिमेलफर्स्ट या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ओलीवियाने सांगितले की, जर मला कॅन्सर झाला नसता तर माझ्यात कधीच दया, करुणा आली नसती. त्यामुळे आयुष्यातील बरेचसे सकारात्मक कामे करण्यापासून मी दूर असते. त्यामुळे कॅन्सरचा जो काही मला भयावह अनुभव घ्यावा लागला त्यासाठी मी आभार मानते. कारण याच काळत मी आयुष्य जगण्याच्या तºहा अवगत केल्या. जेव्हा मी कॅन्सरचा सामना करीत होती तेव्हा मला जे पीडित लोक आहेत, जे आयुष्यात कुठल्या ना कुठल्या व्याधीने ग्रस्त आहेत अशा लोकांना मदत करण्याची संधी मिळाली. कदाचित जीवनाचा सकारात्मक अर्थ मी त्यावेळेस अवगत केला असावा. जर मी कॅन्सर पीडित नसते तर लोकांचे दु:ख समजले नसते. त्यांना मदत करून परमार्थ करण्याची संधी मिळाली नसती. आज मी इतरांचे दु:ख सोबत जगते. मला इतरांच्या दु:खाची जाणीव असल्याने मी त्यांना मदत करू शकते. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे कॅन्सरने मला जगण्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवले. ज्याचा माझ्या प्रकृतीवर खूप चांगला परिणाम झाला असून, माझे आयुष्य फिट ठेवण्यास मी यशस्वी झाली आहे. अर्थात हा सर्व करिष्मा सकारात्मकतेतून आला आहे. त्यामुळे प्रत्येकांनी सकारात्मक विचाराने आयुष्याकडे बघायला हवे, असेही ओलीविया म्हणते.