96 व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर' सिनेमाचा दबदबा पहायला मिळाला. या सिनेमानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या ऑस्करसह एकूण ७ पुरस्कार आपल्या नावावर केलेत. महत्त्वाचं म्हणजे ख्रिस्टोफर नोलन या जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकाला पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर अभिनेता किलियान मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. चित्रपटाच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण टीमच्या आनंदाला पारावार उरला नाही. या चित्रपटाचे हे सर्वात मोठे यश आहे.
'ओपनहायमर' (Oppenheimer) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. जर तुम्ही हा सिनेमा आतापर्यंत पाहिला नसेल तर तो तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. OTT प्लॅटफॉर्म ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित झाला आहे. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहण्यासाठी यूजर्सना १४९ रुपये खर्च करावे लागत आहेत. मात्र आता चाहत्यांना या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा मोफत आनंद घेता येणार आहे. हा चित्रपट २१ मार्चला OTT प्लॅटफॉर्म Jio Cinemaवर मोफत पाहता येणार आहे. आता तुम्ही घरी आरामात बसून या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
'ओपनहाइमर' या सिनेमाची जगभरात चांगलीच क्रेझ आहे. 'ओपेनहायमर' हा हॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. हा सिनेमा ओपेनहायमर यांची पहिली अणुचाचणी 'ट्रिनिटी'बद्दल भाष्य करणारा आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा सिनेमा 21 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. भारतात या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळला.