दणक्या ऑस्कर सोहळा पार पडला. ऑस्कर मिळवणा-या पुरस्कार विजेत्यांचे एकीकडे कौतुक होत असताना एका ऑस्कर विजेत्याची मात्र सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. जोजो रेबिटचे दिग्दर्शक Taika Waititi ने बेस्ट एडोप्टेड स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर दिग्दरशक त्यांच्या खुर्चीवर बसतात. आणि त्यानंतर त्यांनी जे केले त्या सगळ्या गोष्टी कॅमे-यात कैद झाले आहेत.
मिळालेली ऑस्कर ट्रॉफी एका खुर्ची खाली लपवताना दिसतायेत असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून यावर जोरदार टीकाही होत आहे. तर दुसरीकडे खूप खिल्लीही उडवली जात आहे. दिग्दर्शकाचे अशाप्रकारचे कृत्य हे पुरस्काराच अवमान केल्यासारखेच असल्याचेही काहींनी म्हटले आहे.
ऑस्कर 2020मध्ये साऊथ कोरियाचा डंका दिसला. पहिल्यांदा साऊथ कोरियन फिल्मने ऑस्कर आपल्या नावावर केले. आम्ही बोलतोय 'पॅरासाईट' सिनेमाबाबत. सुरुवातपासून 'पॅरासाईट' सिनेमा चर्चेत होता मात्र जेव्हा या सिनेमाला नामांकन मिळाला तेव्हा हा सिनेमा ऑस्कर जिंकेल असे कुणालाच वाटले नव्हते. 'पॅरासाईट'ला कडवी स्पर्धा होती ती '१९१७' सिनेमाशी. पॅरासाईट सिनेमाने तब्बल 4 ऑस्करवर आपलं नाव कोरलं. 'पॅरासाईट' सिनेमात गरीबी आणि श्रीमंत यांच्यातील दरी अत्यंत सुंदरपणे रेखाटली आहे. सिनेमाची कथा हीच याची यूएसपी आहे. 'परासाईट पहिला आशियायी सिनेमा ज्याला ऑस्करने सन्मानित करण्यात आले आहे.