ऑस्कर 2020मध्ये साऊथ कोरियाचा डंका दिसला. पहिल्यांदा साऊथ कोरियन फिल्मने ऑस्कर आपल्या नावावर केले. आम्ही बोलतोय 'पॅरासाईट' सिनेमाबाबत. सुरुवातपासून 'पॅरासाईट' सिनेमा चर्चेत होता मात्र जेव्हा या सिनेमाला नामंकन मिळाला तेव्हा हा सिनेमा ऑस्कर जिंकेल असे कुणालाच वाटले नव्हते. 'पॅरासाईट'ला कडवी स्पर्धा होती ती '१९१७' सिनेमाशी. सुरुवातीला परासाईट सिनेमा काहीसा मागे होता मात्र ऑस्कर जसा जवळ आला तसा हा सिनेमा इतिहास रचणार यांचे संकेत मिळाले.
पॅरासाईट सिनेमाने तब्बल 4 ऑस्करवर आपलं नाव कोरलं. ओरिजनल स्क्रिनप्ले, बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट इंटरनॅशनल फिचर कॅटगरीमध्ये परासाईटला ऑस्कर मिळाला. एकाच सिनेमासला बेस्ट इंटरनॅशनल फिल्म आणि बेस्ट असे दोन्ही अॅवॉर्ड्स एकत्र मिळाले. असे पहिल्यांदा मिळाले. जर स्क्रिनप्ले बाबत बोलायचे झाले तर याच्या स्क्रिनप्ले आणि स्टोरीचे क्रेडिट दिग्दर्शक बोंग जूनला जाते. बेस्ट डायरेक्टर म्हणून त्याला ऑस्कर जाहीर झाला तेव्हा त्याचा आनंद पाहण्यासारखा होता.
'पॅरासाईट' सिनेमात गरीबी आणि श्रीमंत यांच्यातील दरी अत्यंत सुंदरपणे रेखाटली आहे. सिनेमाची कथा हीच याची यूएसपी आहे. 'परासाईट पहिला आशियायी सिनेमा ज्याला ऑस्करने सन्मानित करण्यात आले आहे.