ऑस्करच्या यंदाच्या सोहळ्यातही (Oscars 2021 ) चर्चा रंगली ती सेलिब्रिटींच्या फॅशनची. रेड कार्पेटवर दिमाखात मिरवणा-या काही ललनांच्या ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या. तर काहींचे ड्रेस पाहून अनेकांनी नाके मुरडली. अगदी सोशल मीडियावरही याची चर्चा झाली. यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.
यावर्षी worst-dressed च्या यादीत सर्वात वरचे नाव कुणाचे होते तर अभिनेत्रह Andra Day हिचे. बेस्ट अॅक्ट्रेस श्रेणीत नामांकन मिळालेली अॅन्ड्रा गोल्डन कलरच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर उतरली. पण तिचा हा लूक चाहत्यांना आवडला नाही.
अभिनेत्री Laura Dernचा फेदर ड्रेसची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली. या ड्रेसवरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.
हार्ट शेप हँडबॅग
रेड कार्पेटवर उतरलेली अभिनेत्री Celeste Waite हिच्या छोट्याशा हार्ट शेप हँडबॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याच्या दाढीने केली कमाल
स्विडीश गीतकार Fat Max Gsus याच्या आगळ्यावेगळ्या दाढीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.