९३ व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळा आज लॉस अँजेलिसमध्ये पार पडतो आहे. मात्र यंदा नेहमीसारखा साजरा होणाऱ्या ऑस्कर सोहळा थोड्या वेगळ्या पद्धतीने पार पडतो आहे. जगभरात कोरोनाचा कहर आहे. त्याची दखल घेऊन अनेक गोष्टी यंदा या सोहळ्यात बदलण्यात आल्या आहेत. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नोमालँड चित्रपटाचा जलवा पहायला मिळाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. यासोबत या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार द फादर चित्रपटासाठी अँथनी हॉपकिन्सला मिळाला आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदाचा बेस्ट फिचर फिल्मचा पुरस्कार नोमालँडला मिळाला आहे. तसेच या सिनेमासाठी चुलू जौ हिने सर्वोत्कृष्ट दिग्दशर्काचा ऑस्कर पटकावला आहे आणि याच चित्रपटासाठी अभिनेत्री फ्रांसेस मॅकडॉर्मेंड हिला बेस्ट अॅक्ट्रेसच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा चित्रपट एका महिलेभोवती फिरतो जी आपल्या नवरा आणि घर हरपल्यानंतर एका बंजारनसारखे जीवन व्यतित करते.
हॉपकिन्स यांनी दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी १९९४ साली द सायलन्स ऑफ द लँब्स चित्रपटातील हॅन्निबल लेक्टरच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळवला होता.