जगातले सिनेप्रेमी ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असता तो पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. 'ऑस्कर २०२५' पुरस्कार सोहळ्याचं बिगुल वाजलं आहे. 'ऑस्कर २०२५' हा पुरस्कार सोहळा यंदा कोणत्या तारखेला पाहायला मिळणार याची सर्वजण वाट पाहत होते. अखेर याचा खुलासा झालाय. भारतीय वेळेनुसार 'ऑस्कर २०२५' (oscars 2025) कधी अन् कुठे पाहता येईल, शिवाय यंदाच्या 'ऑस्कर २०२५'मध्ये कोणत्या भारतीय सिनेमावर लक्ष असेल? जाणून घ्या सविस्तर'ऑस्कर २०२५' कधी अन् कुठे पाहता येणार?
'ऑस्कर २०२५' सोहळ्याची सर्वांना उत्सुकता आहे. जगात प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'ऑस्कर २०२५' सोहळ्याचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. ३ मार्चला पहाटे ५.३० वाजता 'ऑस्कर २०२५' भारतात लाइव्ह पाहता येईल. स्टार मूव्हीज सिलेक्ट या टीव्ही चॅनलवर तसेच जिओस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'ऑस्कर २०२५' चं लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. हा सोहळा अमेरिकेत त्यांच्या वेळेनुसार ABC टीव्हीवर रात्री ७ वाजता टेलिकास्ट होईल. अशाप्रकारे भारतीयांना 'ऑस्कर २०२५'चा आनंद घेता येईल.'ऑस्कर २०२५' मध्ये या भारतीय सिनेमाकडे लक्ष'ऑस्कर २०२५' मध्ये यंदा भारताला काहीशी निराशाच आहे. किरण रावचा 'लापता लेडीज' सिनेमा 'ऑस्कर २०२५'च्या शर्यतीतून बाहेर गेला. आता सर्वांचं लक्ष 'अनुजा' या शॉर्टफिल्मवर आहे. गुनीत मोंगा कपूर निर्मित लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म 'अनुजा' (Guneet Monga short film Anuja) शॉर्टलिस्ट झाली आहे. ही शॉर्ट फिल्म वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करते. यामध्ये मराठी अभिनेता नागेश भोसलेसह अनेक कलाकार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्राने शॉर्ट फिल्मच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.