Join us

"नमस्कार, तुम्ही नाश्त्याला..", होस्ट कोनन ओब्रायनने हिंदी बोलून 'ऑस्कर २०२५'मध्ये लावला तडका - Video

By देवेंद्र जाधव | Updated: March 3, 2025 10:16 IST

Conan O'Brien Speaks Hindi: 'ऑस्कर २०२५'चा होस्ट कोनन ओब्रायनने पुरस्कार सोहळ्यांमध्ये खास हिंदी भाषेत भारतीयांशी संवाद साधला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय

'ऑस्कर २०२५' (oscar award 2025) आज संपन्न झाला. भारतात पहाटे ५.३० वाजल्यापासून 'ऑस्कर २०२५'चं प्रसारण सुरु झालं. 'ऑस्कर २०२५' यंदा भारतासाठी फार निराशाजनक वर्ष होतं. कारण भारतातर्फे एकही मोठा सिनेमा यंदा 'ऑस्कर २०२५'च्या नॉमिनेशनमध्ये गेला नव्हता. 'ऑस्कर २०२५'मध्ये फक्त प्रियंका चोप्राची (priyanka chopra) निर्मिती असलेल्या 'अनुजा' या शॉर्टफिल्मकडे (ajuna shortfilm) सर्वांचं लक्ष होतं. अशातच 'ऑस्कर २०२५'मध्ये सुरुवातीलाच भारतीयांना एक सुखद धक्का मिळाला. कारण 'ऑस्कर २०२५'चा होस्ट कोनन ओब्रायनने हिंदी बोलून सर्वांचं मन जिंकलं.'ऑस्कर २०२५'मध्ये बॉलिवूड तडका'स्लमडॉग मिलेनियर', 'RRR' अशा सिनेमांनी गेल्या काही वर्षांमध्ये 'ऑस्कर २०२५'मध्ये भारतीयांचं नाव उंचावलं. त्यामुळे 'ऑस्कर' पुरस्कार सोहळ्यात भारताचा दबदबा पाहायला मिळतो. 'ऑस्कर २०२५'चा होस्ट कोनन ओब्रायनने हिंदी बोलून सोहळ्यामध्ये खास तडका लावला. तो म्हणाला की, “भारत के लोगों को नमस्कार. वहाँ सुबह हो चुकी है तो मुझे उम्मीद है की आप नाश्ते के साथ ऑस्कर देख रहे होंगे." कोननने म्हटलेली हिंदी वाक्य ऐकताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करुन त्याला दाद दिली.

प्रियंका चोप्राच्या अनुजा सिनेमाला ऑस्कर नाही'ऑस्कर २०२५' यंदा सर्व भारतीयांचं लक्ष शॉर्ट फिल्म कॅटेगरीत असलेल्या अनुजा सिनेमाकडे लागलं होतं. या फिल्मला 'ऑस्कर २०२५'मध्ये नामांकन मिळालं होतं. परंतु दुर्दैवाने 'अनुजा'चा ऑस्कर मुकला. त्यामुळे सर्व भारतीयांची घोर निराशा झाली. त्यामुळे यंदाचा 'ऑस्कर २०२५' हा भारतीयांसाठी काहीसा निराशाजनक ठरला. 'ऑस्कर २०२५' यंदा कोणताही वाद न होता शांतपणे पार पडलेला दिसला.

टॅग्स :ऑस्करऑस्कर नामांकनेप्रियंका चोप्राव्हायरल व्हिडिओहॉलिवूड