बिग बॉस कंटेस्टंट व अभिनेत्री पामेला एंडरसन पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी तयार आहे. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पामेला एंडरसनने तिच्या मागील लग्नाबद्दल सांगितलं. यावेळी बोलताना तिने पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छादेखील सांगितली. तिला जेव्हा विचारले गेले की पुन्हा लग्न करणार का, त्यावर ती म्हणाली हो, साहजिक गोष्ट आहे. बस एकदा देवा. बस आणखीन एक. यापूर्वी पामेला तिनदा लग्नबेडीत अडकली आहे.
पामेला एंडरसनने मागील नात्याबद्दल सांगितलं की, देवाची आभारी आहे की हे झाले. मी इथे खुश आहे. माझी तीन लग्न झाली आहेत. लोकांना वाटतं की माझे पाच वेळा लग्न झालं आहे. माहित नाही. माझे तीन वेळाच लग्न झाले आहे. माझे टॉमी लीसोबत लग्न झाले. मग, बॉब रिचीसोबत आणि रिक सोलोमनसोबत विवाह झाला. मला माहित आहे की हे खूप आहे पण हे पाच पेक्षा कमी आहे.तिने चौथ्या लग्नाबद्दल सांगितले की, हो. फक्त आणखीन एकदा. केवळ एकदा आणि देवा एकदाच.