Join us  

भर कॉन्सर्टमध्ये पॉप स्टार शकीरासोबत गैरवर्तन, स्टेजखाली असलेल्या व्यक्तीने तिला...Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:14 PM

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ग्लोबल पॉप स्टार गायिका शकीरा (Shakira) सध्या चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये ती स्टेजवर नाचत असताना एका व्यक्तीने तिला आक्षेपार्ह पद्धतीने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. शकीराची नजर पडताच तिने त्याला चेतावनी दिली. तसंच तिला राग आला आणि ती लगेच खाली उतरली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अनेकदा गायकांच्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये चाहते त्यांच्यासोबत गैरवर्तन करतात. गायिकांना तर बऱ्याचदा याचा सामना करावा लागला आहे. कोणी बॉटलच फेकेल किंवा अगदी दगडही मारेल असे प्रकार घडले आहेत. दरम्यान हॉलिवूडची लोकप्रिय गायिका शकीरासोबत विचित्र प्रकार घडला. शकीराने तिच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी शॉर्ट ड्रेस घातला होता. ती स्टेजवर चढून ठुमके लावत होती आणि गात होती. तेव्हा खाली असलेला एक व्यक्ती तिला खालून विचित्र अँगलने रेकॉर्ड करत होता. हे पाहून शकीराने त्याला इशारा केला की कॅमेरा अँगल माझ्या चेहऱ्यावर घे खाली नाही. यानंतरही त्या व्यक्तीने ऐकलं नाही म्हणून शकीराला राग आला आणि ती कॉन्सर्ट सोडून सरळ खाली उतरली. 

हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनीही नाराजी दर्शवली आहे. 'लोकांची मानसिकता किती घाणेरडी असते' अशा  कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हा व्हिडिओ अमेरिकेतील मियामीमधला आहे. याठिकाणी शकीरा तिचं नवं गाणं 'सॉल्टेरा' वर परफॉर्म करत होती. 

टॅग्स :हॉलिवूडसंगीतसोशल मीडिया