Raja Kumari : कलाकार नेहमीच त्यांच्या सिनेमांमुळे, वैयक्तिक आयुष्यामुळे किंवा वक्तव्यामुळे चर्चेत असतात. हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार शिवभक्त आहेत. पण, तुम्हाला माहितेय का एक अमेरिकन रॅपर महादेवाची कट्टर भक्त आहे. रील लाईफ नव्हे तर खऱ्या आयुष्यातही तिची महादेवावर प्रचंड श्रद्धा आहे. इतकंच नाही तर १६ सोमवारचं व्रतही ती करते.
महादेवाची कट्टर भक्त असलेली ही अमेरिकन रॅपरचं नाव Raja Kumari असं आहे. Raja Kumariचा "काशी टू कैलास' हा अल्बम रिलीज झाला आहे. तिचा हा अल्बम श्रद्धा, भक्ती आणि परिवर्तनाच्या प्रवासाचं दर्शन घडवतो. याबद्दल ती म्हणाली, "हा अल्बम माझ्यासाठी खूप खास आहे. मी जीवनात अध्यात्माकडे वळलं. मी केदारनाथ मंदिरात जायला लागले. जेव्हा मी महादेवासमोर उभी राहिले, तेव्हा मी पुढे काय करावं असं विचारलं आणि त्यांचं उत्तर स्पष्ट होतं समर्पण".
पुढे ती म्हणाली, "शिव तांडव हे मला लहानपणापासून आवडतं. महादेवासारखे कपडे घालणं आणि नृत्य करणं हा नेहमीच माझ्या आयुष्याचा एक भाग राहिला आहे". महाशिवरात्र ही Raja Kumariसाठी खास असते. ती म्हणाली, "मी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ध्यान करते आणि त्यातून मला खूप ऊर्जा मिळते. शिव आणि पार्वतीच्या प्रेमकथेने मला प्रेरणा मिळाली आहे, ज्यामुळे मला १६ व्या सोमवारचे उपवास करण्याची प्रेरणा मिळाली".राजा कुमारीचं 'जवान' चित्रपटातील शीर्षकगीत खूप लोकप्रिय झालं होतं.