आत्तापर्यंत अभिनेत्री पब्लिसिटी मिळवण्यासाठी न्युड फोटोशूट करत असल्याचे आपल्या सा-यांना माहिती आहे. मात्र अमेरिकन अभिनेत्री मारग्रेट लिएनने एका वेगळ्याच कारणासाठी तिचे न्युड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आजपर्यंत आपण विविध आजाराबाबंत बोलत आलो आहोत त्याविषयी जनजागृती करत आहोत. मात्र सोरायसीस हा देखील एक गंभीर आजार आहे. या त्वचेसंबधी आजाराची जनजागृती करण्यासाठी तिने पुढाकार घेतला आहे. या आजाराची माहिती अधिक व्हावी यासाठी तिने स्वतःचे न्युड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोत मारग्रेटची त्वचेला झालेली एलर्जी दिसत आहे. मारग्रेट गेल्या काही वर्षांपासून सोरायसीस आजाराने ग्रस्त आहे. जागतिक सोरायसिस दिवसाचे औचित्य साधत मारग्रेटने या आजारासंबंधित जागरुकता निर्माण करण्याचे ठरवले आणि तिच्या फोटोशूटच्या माध्यमातून ती आता या विषयी जनजागृती करत आहे.
हे न्युड फोटो पाहून चाहत्यांनीही तिला सपोर्ट करत तिच्या या धाडसाचे कौतुकच केले आहे. तसेच तिच्या या आजाराविषयी देखील जास्तीत जास्त माहिती लोकांना व्हावी यासाठी पुढाकर घेणार असल्याचेही चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत.
डॉक्टरांच्या मते या त्वचारोगार असे कोणतेही ठोस उपचार नाहीत जेणेकरून ते पूर्णपणे बरे होऊ शकेल. फक्त त्याची लक्षणे पाहून, उपचार करत त्यावर काही अंशी नियंत्रण मिळवू शकतो असेही तिने म्हटले आहे.