Join us

या कारणामुळे किम कार्देशियन झाली नर्व्हस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 2:37 PM

किमने केस कापले असून त्यात सुंदर दिसत नसल्याचे तिला वाटते.

ठळक मुद्देकिमचा नवा लूक

रिऍलिटी शो स्टार किम कार्देशियन नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने कोरोनातल्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्युशन फॉर वुमेन या कारागृहाला भेट दिली होती व तिथल्या महिला कैद्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली होती. तसेच ते कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासाठी ती योजना आखणार होती. तिच्या या कामाचे खूप कौतूक झाले होते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिने केस छोटे केल्यामुळे ती नाराज झाली आहे.

किमने नुकतेच केस बारीक केले आहेत. पण आता ती या कापलेल्या केसांमुळे खूपच नर्व्हस झाली आहे. या बारीक केसांमुळे आपण सुंदर दिसत नसल्याचे तिला वाटायला लागले आहे. आपल्या कापलेल्या छोट्या केसांमुळे लोक आपल्याबद्दल काय काय बोलू लागले आहेत, हे तिने तिच्या स्नॅपचॅट अकाऊंटमध्ये लिहीले आहे. स्नॅपचॅट अकाऊंटमध्ये किमने लिहिले की, 'मी माझ्या केसांना खूप जपायचे. मी छान दिसत असेनही कदाचित. पण सेक्‍सी दिसत नाही, हे निश्‍चित.' आपले केस पुन्हा पहिल्यासारखे वाढण्याची आपण वाट बघणार असल्याचे तिने ट्‌विटर अकाउंटमध्येही लिहीले आहे. लांब केसांचा तिला एवढा लळा आहे. तिने केस कापायचा निर्णय कशासाठी घेतला असेल हे अद्याप समजू शकले नाही.  किम स्वतःला लाजाळू म्हणवते मात्र सोशल मिडीयावर तिने स्वतःचे बिकीनीतले फोटो शेअर केले आहेत. 

 

 

टॅग्स :किम कार्देशियन