Join us  

​रॉबर्ट डी निरोंनी दिला श्वार्झनेगरसोबत फोटोस नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2016 3:14 PM

दोन हॉलीवूड लेजेंडर अ‍ॅक्टर्स एकाच फोटोमध्ये दिसणार असतील तर तो फोटो किती महत्त्वाचा ठरू शकतो, याची कल्पना करणे अवघड ...

दोन हॉलीवूड लेजेंडर अ‍ॅक्टर्स एकाच फोटोमध्ये दिसणार असतील तर तो फोटो किती महत्त्वाचा ठरू शकतो, याची कल्पना करणे अवघड नाही. ते अ‍ॅक्टर्स जर रॉबर्ट डी निरो आणि अरनॉल्ड श्वार्झनेगर असतील तर काही विचारूच नका. परंतु या दोघांना एका फ्रेममध्ये पाहण्याची तमाम चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहिली कारण डि निरोंनी श्वार्झनेगरसोबत फोटो काढण्यास नकार दिला.हॉलीवूडच्या बेव्हर्ली हिल्स येथील ‘द फ्रेंड्स आॅफ द इस्रायल डेफेन्स फोर्सेस वेस्टर्न रिजनल गाला’ कार्यक्रमात हे दोन महान अभिनेते उपस्थित होते. जेव्हा डी निरोंना श्वार्झनेगरसोबत फोटो काढण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले की, ‘जर तो डोनल्ड ट्रम्पचे समर्थन देत असेल तर मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. ’संपूर्ण भेटी दरम्यान ते श्वार्झनेगरला ‘तु ट्रम्पला मतदान करणार आहेस का?’ असे विचारत होते. मध्यंतरी अरनॉल्डने ट्रम्पच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. पण ८ आॅक्टोबर रोजी त्याने ‘मी ट्रम्पला मतदान करणार नाहीए’ असे ट्विट केले होते. मग तो कोणाला मत देणार हे अद्याप निश्चित नाही.तो म्हणाला की, ‘१९८३ साली मी जेव्हा या देशाचा नागरिक झालो, तेव्हापासून एकाही रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष उमेदवारास मी मतदान केलेले नाही.’मात्र यावर डी निरोंचे समाधान झाले नाही. ते म्हणाले की, ‘तुम्ही जर समस्या सोडवण्यासाठी मदत करीत नसाल तर तुम्ही अप्रत्यक्षरीत्या का होईना पण समस्येला वाढवण्याचे काम करत असता.’मंगळवारी (दि. ८)  राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे  हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनल्ड ट्रम्प यामध्ये दावेदार आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रचार-प्रसार, रॅली, भाषणं, वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनंतर अखेर अमेरिकन जनता त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडणार आहे.द लेजेंड्स : अरनॉल्ड श्वार्झनेगर आणि रॉबर्ट डी निरोहॉलीवूड सेलिब्रेटींमध्ये बहुतांश जणांनी हिलरी क्लिंटन यांना सहमती दर्शवलेली आहे. अनेकांनी तर त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये हजेरीसुद्धा लावली. राजकीय मतभेदामुळे दोन स्टार्समध्ये असा दुरावा निर्माण होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. म्हणून तर सर्वांनाच डी निरोंच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटतेय.