Romeo And Juliet : 1968 मध्ये आलेला हॉलिवूडचा हिट सिनेमा 'रोमिओ आणि ज्यूलिएट' च्या मुख्य अभिनेता आणि अभिनेत्रीने प्रसिद्ध कंपनी पेरामाउंट पिक्चर्सवर 500 मिलियन डॉलर म्हणजे साधारण 41 अब्ज 40 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. सिनेमा रिलीज होऊन 50 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेल्यावर या कलाकारांनी तीन जानेवारीला ही केस केली. त्यांनी त्यांच्यावर शूट केलेल्या न्यूड सीनबाबत ही केस केली आहे. त्यांनी सिनेमात त्यांच्यावर शूट करण्यात आलेल्या सीनबाबत तक्रार करत सांगितलं की, त्यांची फसवणूक करून शूटींग करण्यात आलं. त्यावेळी ते तरूण होते. सिनेमाची हिरोईन ओलिविया हसी तेव्हा 15 वर्षाची आणि हिरो लियोनार्डो व्हाइटनिंग 16 वर्षांचा होता. तो हसी 71 ची आणि व्हायटनिंग 72 चा झाला आहे.
न्यूडिटी आणि कॅमेरा अॅंगल
दोन्ही कलाकारांनी लॉस एंजलिस काउंटीच्या सुपीरिअर कोर्टात निर्मात्यावर लैंगिक शोषण आणि फसवणुकीची केस केली आहे. याचिकेनुसार, सिनेमाचे दिग्दर्शक फ्रेंको जॅफीरेलीने कलाकारांना सांगितलं होतं की, बेडरूम सीनमध्ये दोघेही स्कीन-कलरचे अंडरगारमेंट्स घालतील. पण तसं झालं नाही. शूटींगच्या सकाळी दिग्दर्शक व्हाइटनिंग आणि हसीला म्हणाला की, त्यांच्या अंगावर एकही कपडा राहणार नाही. फक्त न्यूड मेकअप असेल. जॅफीरेलीने त्यांना विश्वास दिला की, सीन शूट करताना कॅमेरा अॅंगल असा असेल जेणेकरून काहीच न्यूडिटी दिसणार नाही. आता याचिकेत सांगण्यात आलं आहे की, सीन पूर्णपणे न्यूडिटी फ्री शूट झाला नाही. दिग्दर्शक फ्रेंको जॅफीरेलीचं 2019 मध्ये निधन झालं आहे.
सिनेमा हिट झाला आणि....
याचिकेत कलाकारांनी आरोप लावला की, दिग्दर्शकाने त्यांना घाबरवलं होतं की, जर सिनेमा चालला नाही तर त्यांचं करिअर संपेल. त्यामुळे त्यांना न्यूड होऊन शूट करावं लागेल. ओलीविया हसी आणि लियोनार्डो व्हाइटनिंग नुसार त्यावेळी त्या स्थितीत दिग्दर्शकाचं म्हणणं ऐकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. दोघांनुसार, अनेक वर्ष त्यांना या सीनमुळे मानसिक आणि भावनात्मक त्रासाचा सामना करावा लागला. कारण सिनेमा मोठा हिट ठरला आणि हायस्कूलमध्ये शेक्सपिअर शिकत असलेल्या तरूणांना हा सिनेमा दाखवला जाऊ लागला. पण रोमिओ आणि ज्यूलिएटच्या यशाचा कलाकारांच्या करिअरवर काहीच प्रभाव पडला नाही. आता लवकरच या केसवर सुनावणी होईल.