Join us

फ्लाइटमध्ये नशा केल्यामुळे समंथाला अटक; सहप्रवाशासोबत घातला वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 10:10 AM

Samanth fox: समंथामुळे विमान उड्डाणास उशीर झाला. परिणामी, विमान पुन्हा रनवेवर आणण्यात आलं.

पॉप आयकॉन समंथा फॉक्स (Samantha Fox) हिला लंडनविमानतळावर पोलिसांनी अटक केली आहे. समंथा विमानात बसून नशा करत होती. इतकंच नाही तर तिने सहप्रवाशासोबत वादही घातला. त्यामुळे तिला लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

१९८० च्या दशकातील प्रसिद्ध गायिका समंथा लंडनवरुन म्युनिकला निघाली होती. यावेळी विमान प्रवास करत असताना तिचं सहप्रवाश्यासोबत भांडण झालं. तिच्या या वादामुळे विमान उड्डाणास उशीर होत होता. मात्र, तरी सुद्धा ती भांडण करत होती. अखेर तिला विमानातून खाली उतरवण्यात आलं. इतकंच नाही तर ती विमानात नशा करत असल्यामुळे तिला पोलिसांनी अटक केली आहे.

समंथा ब्रिटिश एअरवेजने प्रवास करत होती. यावेळी तिचे सतत सहप्रवाशासोबत वाद होत होते. परिणामी, या भांडणाचा त्रास इतर प्रवाशांना झाला. त्यांच्या वादामुळे विमान पुन्हा रनवे वर आणण्यात आलं. यावेळी समंथाने नशापाणी केल्याचं समोर आलं. ज्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली.

घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित विमान यंत्रणेने प्रवाशांची माफी मागितली. तसंच प्रवाशांचा वेळ वाया गेल्यामुळे त्यांची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या सगळ्या प्रवाशांची पुन्हा यात्रा सुरु करण्यात आली.

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटीलंडनविमानतळ