Join us

SEE : ह्यु जॅकमनचा ‘वुल्वोरिन ३’ लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 4:42 PM

बहुप्रतिक्षित ‘वुल्वोरिन ३’ अर्थातच ‘लोगन’ चित्रपटातील ह्यु जॅकमनच्या वयोवृद्ध वुल्वोरिनचा पहिला ‘लूक’ दिग्दर्शक जेम्स मँगोल्डने ट्विटरवर शेअर करून चाहत्यांना ...

बहुप्रतिक्षित ‘वुल्वोरिन ३’ अर्थातच ‘लोगन’ चित्रपटातील ह्यु जॅकमनच्या वयोवृद्ध वुल्वोरिनचा पहिला ‘लूक’ दिग्दर्शक जेम्स मँगोल्डने ट्विटरवर शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. या कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) फोटोमध्ये जॅकमनची दाढी वाढलेली आणि गालावर वार असून डोळ्यात एकप्रकारचा थकवा आणि हताशपणा जाणवतो.‘एक्स-मेन’ सिरीजमधील ‘लोगन’चे कथानक २०२४ मध्ये घडते. आतापर्यंतच्या सर्व ‘वुल्वोरिन’ व ‘एक्स-मेन’ चित्रपटांपेखा हा सिनेमा अधिक गंभीर आणि डार्क असल्याचे सांगण्यात येत आहे.जॅकमन यामध्य वयोवृद्ध ‘वुल्वोरिन’च्या (लोगन) भूमिकेत असून त्याच्याकडे असणारी शक्ती आता लयास जात आहे. त्याची स्थिती अत्यंत बिकट असून तो दारूच्या आहारी गेलेला आहे. तो आजारी असून त्यांची सुपरपॉवर हळूहळू कमी होतेय तसेच त्याची जखमदेखील पूर्वीप्रमाणे झटपट भरून निघत नाही.चित्रपटाच्या कथानकानुसार २०२४ अज्ञात कारणामुळे म्युटंटस्चा जन्मदर मोठ्या प्रमाणावर घटतो. भ्रष्ट सरकारी यंत्रणार ‘ट्रान्सिजन’ प्रोग्रामा अंतगर्त म्युटंटस्च्या मुलांना नरसंहार करणारे हत्यारे बनवत आहे. अशा काळात लोगन एका लहान मुलीला प्रशिक्षण देत आहे. पॅट्रिक स्टुअर्ट ‘प्रोफेसर एक्स’च्या भूमिकेत आहे.वुल्वोरिन : ह्यु जॅकमनजॅकमनने सर्व प्रथम २००० साली ‘एक्स-मेन’ चित्रपटात वुल्वोरिन साकारला होता. त्यानंतर अनेक सिक्वेल्समध्ये त्याने काम केले आहे. ‘एक्स-मेन ओरिजिन्स : वुल्वोरिन’ आणि ‘द वुल्वोरिन’ या दोन वुल्वोरिन फिल्म्समध्येसुद्धा त्याने ही भूमिका केली आहे.