ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याच्या जीवनावर आधारित लवकरच एक बायोपिक (Shane Warne Biopic) येणार आहे. सध्या या बायोपिकवर काम सुरु असून या सिनेमाच्या सेटवर एक विचित्र अपघात घडला आहे. या अपघातामध्ये सिनेमातील मुख्य अभिनेत्री जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या बायोपिकमधील एका सेक्स सीनचं चित्रीकरण सुरु होतं. हा सीन शूट होत असतानाचा अपघात घडला आणि शेन वॉर्नची भूमिका करणारा अभिनेता आणि त्याची सहअभिनेत्री जखमी झाले आहेत. या बायोपिकमध्ये अभिनेता अॅलेक्स विल्यम प्रमुख भूमिका साकारत आहे. तर मॅरनी कॅनडी ही वॉर्नची पूर्वाश्रमीची पत्नी सायमन कॅलहनची भूमिका साकारत आहे.
कसा झाला अपघात
बायोपिकचं शुटिंग सुरु असताना आम्ही कॉरिडोअरमधून चालत जाऊन अचानकपणे बेडरुममध्ये जातो आणि बेडवर पडतो असा सीन होता. परंतु, ठरलेल्या सिक्वेन्सप्रमाणे काहीच घडलं नाही.आम्ही बेडवर पडलोच नाही. त्याऐवजी आम्ही जमिनीवर पडलो. त्यामुळे माझ्या मनगटाला दुखापत झाली आणि शरीराचं वजन हातावर पडल्यामुळे अॅलेक्स विल्यमच्या हातालाही दुखापत झाली. हा अपघात झाल्यानंतर काही वेळाने आम्हाला रुग्णालयातील इमर्जन्सी रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं, असं कॅनडीने सांगितलं.
असं झालं शेन वॉर्नचं निधन
४ मार्च २०२२ रोजी शेन वॉर्न थायलंडमध्ये व्हेकेशनसाठी गेला होता. यावेळी त्याचं कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. त्याच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियातील चॅनेल 9 वर शेन वॉर्नच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार केला जात आहे.