बॉलिवूड इंडस्ट्री असो वा मराठी सिनेइंडस्ट्री या ठिकाणी स्त्री पुरूष असा मानधनाबाबतीतील भेदभाव किंवा कास्टिंग काऊचसारखी प्रकरणं बऱ्याचदा ऐकायला मिळत असतात. मात्र याला हॉलिवूडदेखील अपवाद नाही. कारण अमेरिकी सिंगर क्रिस्टीना ऐगीलेराने हॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
वयाच्या १९ व्या वर्षी पहिला म्युझिक अल्बम लाँच करणाऱ्या क्रिस्टीनाने हॉलिवूड म्यूझिक इंडस्ट्रीला पुरूष प्रधान म्युझिक इंडस्ट्री संबोधत म्हणाली की, जेव्हा तुम्ही कमी वय असताना पुरूष प्रधान इंडस्ट्रीत पदार्पण करता तेव्हा ते तुम्हाला पाहून तुमच्यावर टिक्का टिप्पणी करतात. ते माझ्या स्तनाबद्दल बोलले होते.