Join us  

shocking : हार्वे विंस्टननंतर ‘या’ दिग्दर्शकाचा पर्दाफाश; ३८ अभिनेत्रींनी म्हटले, ‘याने आमचे लैंगिक शोषण केले’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 11:13 AM

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे प्रसिद्ध निर्माता हार्वे विंस्टन यांच्यावर हॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेत्रींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. आता ...

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे प्रसिद्ध निर्माता हार्वे विंस्टन यांच्यावर हॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेत्रींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. आता हॉलिवूडमधीलच आणखी एका दिग्दर्शकावर अशाच प्रकारचे आरोप करण्यात आले असून, तब्बल ३८ महिलांनी या दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा ठपका ठेवला आहे. होय, आॅस्करसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या प्रसिद्ध लेखक तथा दिग्दर्शक जेम्स टॉबेक यांनी १९८०च्या दशकात तब्बल ३८ महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. व्हेरायटी डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, लॉस एंजेलिस टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत विस्तारपणे सांगण्यात आले आहे. रिपोर्टनुसार कथित घटना घडली त्याकाळात काही महिला मनोरंजन विश्वात कामाच्या शोधात आल्या असता, टॉबेक यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे शोषण केले. या ३८ महिलांपैकी ३१ महिलांनी स्वत:हून समोर येत याविषयी मोकळेपणाने सर्व हकीकत सांगितली. यातील काही महिलांनी असे म्हटले की, टॉबेक यांनी कामाच्या मुद्द्यावरून कथित रुपात अश्लील संवाद साधला. संबंध नसतानाही वारंवार अश्लीलता समोर आणत त्याला नेमके काय अपेक्षित आहे ते अधोरेखित केले. ही बाब जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा त्याने आमचे लैंगिक शोषण केले. एकदा दोन वेळा नव्हे तर वारंवार टॉबेकने आमचे शोषण केल्याचे या महिलांनी सांगितले. हॉलिवूड अभिनेत्री एडरीन लावॅलीने २००८ मधील हॉटेलच्या एका रूममध्ये झालेल्या घटनेविषयी सांगितले की, ‘टॉबेकने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने मला हेदेखील म्हटले होते की, हे सर्व केल्याशिवाय तुला कुठेच काम मिळणार नाही. परंतु मी त्याला बळी पडली नाही. जेव्हा मी उठून उभी राहिली तेव्हा त्याने त्याचे पॅण्ट सावरत माझ्याशी दूरव्यवहार करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. लावॅलीने हा किस्सा सांगताना म्हटले की, ‘त्यावेळी मी स्वत:ला एखाद्या वारांगणेप्रमाणे समजू लागली होती. माझ्या मनात स्वत:विषयी, आई-वडिलांविषयी आणि मित्रांविषयी संकुचित भाव निर्माण झाला होता. वास्तविक त्याकाळी इंडस्ट्रीव्यतिरिक्त बाहेरच्या दुनियेत टॉबेक हे काही मोठे नाव नव्हते. परंतु ‘टायसन, द  गॅम्बरल आणि पिक-अप आर्टिस्ट लिहिल्यानंतर त्यांना यश प्राप्त झाले. टाइम्स रिपोर्टमध्ये ज्या महिलांनी हे आरोप लावले त्यांच्यात, रिनाल्डी, लुइस  पोस्ट, करेन स्केलेयर, अन्ना स्कॉट, इको डनोन आणि चांटल कौर्सिनो यांसारख्या बड्या स्टारच्या नावांचा समावेश आहे.