Join us

धक्कादायक..! रस्त्यावर न्यूड फिरत होती अभिनेत्री, पोलीस येताच समोर आलं हैराण करणारं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 1:00 PM

ही अभिनेत्री ३६ वर्षांची असून ती रस्त्यावर विवस्त्र फिरताना दिसली होती.

अमेरिकन अभिनेत्री अमांडा बायनेस(Amanda Bynes)च्या अवस्थेने चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्री रस्त्यावर विवस्त्र फिरताना दिसली, त्यानंतर तिला मानसिक उपचारासाठी पाठवण्यात आले. अमांडा बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त आहे. गेल्या काही वर्षांपासून तिची मानसिक स्थितीही ठीक नाहीये.

हॉलिवूड अभिनेत्री अमांडा बायनेस गेल्या काही वर्षांपासून वाईट टप्प्यातून जात आहे. कॅलिफोर्निया स्थित अभिनेत्रीला मानसिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अलीकडेच अमांडा लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर नग्न अवस्थेत फिरताना दिसली होती. तिने रस्त्याच्या मधोमध एक कार थांबवली आणि ड्रायव्हरला स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली. यानंतर, अभिनेत्रीला ती रस्त्यावर नग्नावस्थेत उभी असल्याचे लक्षात येताच त्याने 911 महिला हेल्पलाइनवर कॉल केला.

अमांडाला तत्काळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जिथे तात्काळ तिला ७२ तासांसाठी मनोरुग्ण कोठडीत पाठवण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, अमांडा काही दिवसांपासून तिची औषधे घेत नव्हती. टीएमझेड टॅब्लॉइडच्या अहवालानुसार, अमांडा अजूनही रुग्णालयात दाखल आहे. तिथे काही दिवस अॅडमिट ठेवून तिच्यावर उपचार केले जातील. अमांडाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचं अहवालात समोर आलं आहे. रस्त्यावर फिरताना तिच्यासोबत कोणतीही घटना घडलेली नाही. पण ज्या भागात ती सापडली, तिथे तिच्यासोबत काहीही वाईट घडू शकत होते.अमांडाचा तिच्या कुटुंबाच्या संपर्कात नाही. अभिनेत्रीचा माजी प्रियकर पॉल मायकलने सांगितले होते की, अमांडा तिची औषधे वेळेवर घेत नाही, ती बर्‍याचदा वाईट वागू लागते. अमांडा आणि पॉल शेवटचे डिसेंबर २०२२ मध्ये एकत्र दिसले होते. दोघांच्या ब्रेकअपनंतरच अमांडाची मानसिक स्थिती बिघडल्याची बातमी समोर आली होती. अभिनेत्रीच्या आईने सांगितले होते की अमांडा २०१३ पासून बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त आहे.

अमांडा ३६ वर्षांची आहे. २०१३ मध्ये जेव्हा तिला बायपोलर डिसऑर्डरचे निदान झाले तेव्हा तिच्या आईने त्याची जबाबदारी घेतली. जी वर्षभरापूर्वी संपली. पेपर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अमांडाने सांगितले की तिला ड्रग्जचे व्यसन आहे. त्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मला वाटायचं की हे जग माझ्या कामाचं नाही. सर्व काही उदास आणि गडद दिसत होते. यावर मात करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मला खूप काम करायचे आहे.

कोण आहे अमांडा अमांडा बालकलाकार म्हणून ओळखली जाते. निकेलोडियन कॉमेडी स्केच सिरीज ऑल दॅटमधून तिला प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती शोमध्येही दिसली होती. अमांडाला दोन यंग आर्टिस्ट पुरस्कारही मिळाले आहेत. अमांडाने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्री तिचा परफ्यूम ब्रँडही लॉन्च करणार होती.