नव्वदच्या दशकात विशेष प्रसिद्ध मिळवणारा रॅपर कुलिओ (Gangstas Paradise Fame Rapper Coolio Found)चे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्या मॅनेरजने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'गँगस्टाज पॅराडाइज' या त्याच्या आयकॉनिक गाण्यामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती. कुलिओचा मृतदेह त्याच्या मित्राच्या घरात आढळला. लॉस एंजेलिसमधील मित्राच्या घरात बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढलला होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
कुलिओने १९८० च्या दशकात संगीत बनवण्यास सुरुवात केली होती. पण जेव्हा त्याने १९९५ मध्ये जेव्हा त्याने गँगस्टार्स पॅराडाईज रेकॉर्ड केले तेव्हा त्याने हिप हॉपच्या जगतात त्याचे नाव कोरले. एक भन्नाट रॅपर अशी ओळख त्याने म्युझिक इंडस्ट्रीत निर्माण केली आहे.
कुलिओचं खरं नाव आर्टिस लिओन इवे जूनियर असं होतं. त्याला 'गॅंगस्टाज पॅराडाइज'साठी 'सर्वोत्कृष्ट सोलो रॅप परफॉर्मन्स'साठी 'ग्रॅमी पुरस्कार' मिळाला होता. हा साउंडट्रॅक Michelle Pfeiffer च्या डेंजरस माइंड्स चित्रपटात वापरण्यात आला आहे. त्याचे हे गाणं मोठ्या प्रमाणात ऐकलं गेलं. त्याच्या वेबसाइटवरील माहितीनुसार हे अलीकडेच एक अब्ज वेळा स्पॉटिफायवर ऐकलं गेलं आहे. कुलिओला इतरही पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.कुलिओच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. कुलिओने त्याच्या आयुष्यातील चार दशकं या इंडस्ट्रीला दिली. या कारकिर्दीमध्ये त्याने अमेरिकन म्युझिक अवॉर्ड आणि तीन एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड जिंकले आहेत.