Join us  

स्टांटनचा निर्दयी सीनला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2016 9:34 PM

इमेल्डा स्टांटन हिने खुलासा केला की, तिला ‘हॅरी पॉटर’मध्ये डोलोरेस अंब्रिजची भूमिका साकारताना काही निर्दयी सीन करावे लागले. मात्र, ...

इमेल्डा स्टांटन हिने खुलासा केला की, तिला ‘हॅरी पॉटर’मध्ये डोलोरेस अंब्रिजची भूमिका साकारताना काही निर्दयी सीन करावे लागले. मात्र, त्यामुळे तिच्या आयुष्यावर खूप विपरीत परिणाम झाला असून, अशाप्रकारचे सीन करणे मला आवडणार नाहीत. ६० वर्षीय स्टांटनने चित्रपटात मिनिस्ट्री आॅफ मॅजिक प्रोफेसर डोलोरेस अंब्रिजची भूमिका साकारली होती. एंटरटेनमेंट विकली या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले की, ही भूमिका साकारणे माझ्यासाठी खरोखरच एक आव्हान होते. कारण काही सीन देताना मला खरोखरच अडचणींचा सामना करावा लागला. त्यात ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द आॅर्डर आॅफ द फिनिक्स’चा तो सीन खृपच अवघड होता, ज्यात हॅरीला काही लाईन्स लिहण्यासाठी मला भाग पाडावे लागले. यामध्ये मला अतिशय निर्दयीपणे वागावे लागले. त्यामुळे पडद्यावर माझी पर्सनालिटी एक निर्दयी अभिनेत्री म्हणून होईल अशी मला सातत्याने भीती वाटत होती. पुढे बोलताना स्टांटन म्हणाली की, हॅरी पॉर्टरनंतर मी माझ्या भूमिकेबाबत काही निकष ठरविले होते. कथेच्या डिमांडनुसार मला भूमिका साकारणे मुश्किल होईल. मला जर काही सीन्स करणे अवघड जात असतील, तर मी त्यास स्पष्ट शब्दात नकार देईल. कारण हॅरी पॉर्टरमधील निर्दयी व्यक्तीरेखा साकारल्यानंतर मी बरेचसे दिवस स्वत:ला निर्दयी समजत होते. मला माझा तिरस्कार वाटत होता. काही दिवस मी घराबाहेर न पडण्याचे ठरविले होते. आता मी अशाप्रकारची भूमिका साकारणार नाही, असा निर्णय घेतल्याने समाधान वाटत आहे. भविष्यात चांगल्या भूमिका निभावण्याकडे माझा कल असेल, असेही स्टांटन यांनी सांगितले.