Join us  

​डवेन जॉन्सनने मानले शरद केळकरचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2016 10:14 PM

डिन्जेचा ‘माओना’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटासाठी शरद केळकर याने डबिंग केली आहे. ‘माओना’मध्ये ड्वेन जॉनसन याने मौली या पात्राला आवाज ...

डिन्जेचा ‘माओना’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटासाठी शरद केळकर याने डबिंग केली आहे. ‘माओना’मध्ये ड्वेन जॉनसन याने मौली या पात्राला आवाज दिलाय. ‘माओना’च्या भारतीय रुपातरणांत मौलीचा आवाज शरद केळकरचा असेल. या चित्रपटाच्या डबिंगनंतर ड्वेन जॉन्सनने भारतीयांचे व शरद केळकरचे आभार मानेल आहे. अभिनेता शरद केळकर विन डिजेलच्या आगामी ‘ट्रिपल एक्स द रिर्टन आॅफ झेंडर केज’ या चित्रपटातील विनच्या भूमिकेला आवाज दिला आहे. यापाठोपाठ डिज्नेच्या ‘माओना’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटातील मौली या महत्त्वाच्या भूमिकेला ‘द रॉक’ ड्वेज जॉनसन याने आवाज दिला आहे. अमेरिकेत हा चित्रपट सुपरहिट ठरला असून भारतात 2 डिसेंबरला प्रदर्शित केला जाणारा आहे. ‘माओना’च्या मधील ड्वेन जॉनसनने मौलीच्या पात्राला दिलेला आवाज हिंदी रुपांतरणात अभिनेता शरद केळकर याने डब केला आहे. डबिंगनंतर ड्वेनने शरदचे आभार मानले आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून शरदचे आभार व्यक्त करताना भारतीयांचे देखील आभार मानले आहे. शरदने ट्विट करून मला ड्वेनच्या आवाजाचे रुपातरण करताना खूप मजा आली असे सांगितले होते. डिज्नेच्या आगामी माओना या चित्रपटात संगीतकार बप्पी लहरी यांनी देखील आवाज दिला आहे. या चित्रपटातील टम्माटोआ या महाकाय खेकड्याला आवाज दिला आहे. गुलझार व विशाल भारद्वाज यांच्या ‘जंगल जंगल बात चली है’ या गाण्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आणि त्याचे हिंदी व्हर्जन ‘बेअर नेसेसिटीज’ हे विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केले आहे.  विशाल दादलानी यांच्या स्टुडिओमध्ये याचे डबिंग करण्यात आले. }}}} ">http://