Join us  

'द एक्झॉरसिस्ट - बिलिव्हर'चा दुसरा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 4:32 PM

The Exorcist: Believer : द एक्सॉसिस्ट: बिलिव्हर ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युनिव्हर्सल पिक्चर्सने नुकताच वर्षातील सर्वात मोठा हॉरर चित्रपट - द एक्सॉर्सिस्ट: बिलीव्हरचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. डेव्हिड गॉर्डन ग्रीन दिग्दर्शित 'द एक्सॉर्सिस्ट: बिलीव्हर' आता जागतिक प्रकाशन तारखांशी जुळवून घेत ६ ऑक्टोबर रोजी भारतात प्रदर्शित होईल. ट्रेलर द एक्सॉर्सिस्ट या थंडगार जगाची झलक देतो. 

एक्झॉर्सिटमध्ये अकादमी पुरस्कार प्राप्त अभिनेत्री एलेन बर्स्टिन, जेनिफर नेटल्स आणि ऐन डाऊड मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. त्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.  

पुढील महिन्यात ६ ऑक्टोबर २०२३ रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत असून तो इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.