Time's Up : लैंगिक शोषणाविरोधात ‘या’ अभिनेत्रींनी पुकारला एल्गार; सुरू केले नवे अभियान!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 9:34 AM
हॉलिवूडमधील ए-लिस्टर्स आणि काही अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील लैंगिक शोषणाविरोधात एक नवे अभियान सुरू केले आहे. हे अभियान हार्वे वायनस्टाइनवर करण्यात ...
हॉलिवूडमधील ए-लिस्टर्स आणि काही अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील लैंगिक शोषणाविरोधात एक नवे अभियान सुरू केले आहे. हे अभियान हार्वे वायनस्टाइनवर करण्यात आलेल्या कथित लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर अधिक तीव्र करण्याच्या निर्धाराने सुरू केले आहे. हॉलिवूड रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या अभियानाचे नाव ‘टाइम्स अप’ असे आहे. या अभियानाला अभिनेत्री मेरिल स्ट्रीप, रीसी विदरस्पूून, निकोल किडमॅन, मार्गोट रॉबी, जेनिफर एनिस्टन, एशले जुड, अमेरिका फेरेरा, नॅटली पोर्नमॅन, एम्मा स्टोन आणि केरी वॉशिंग्टन यांसारख्या बड्या अभिनेत्रींसह शेकडो लोकांनी समर्थन दिले आहे. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने औपचारिकरीत्या या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाशी जुडलेल्या इंडस्ट्रीतील शेकडो महिलांनी एका कोºया पत्रावर स्वाक्षºया केल्या आहेत. या अभियानाअंतर्गत विविध क्षेत्रांतील पीडितांसाठी कायदेशीर मदतीसाठी एका स्वतंत्र गटाची स्थापना केली जाणार आहे. ज्याकरिता १.३ कोटी डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना कायदेशीर लढा देण्यासाठी खर्च केली जाईल.या आर्थिक मदतीसाठी अभिनेत्री केटी मॅकग्रेथ, जेजे अब्राम, जेनिफर एनिस्टन, मेरिल स्ट्रीप, केट कॅपशॉ आणि स्टीफन स्पीलबर्ग यांच्या वुंडरकायंडर फाउंडेशनने मदत केली आहे. हा संपूर्ण निधी या फाउंडेशनकडूनच उपलब्ध करून दिला जाणार. या अभियानात सहभागी झालेल्या सर्व अभिनेत्री आगामी गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये काळे कपडे परिधान करून सहभागी होणार आहेत. दरम्यान, गेल्या काहीकाळापासून #MeeToo हे अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत जगभरातील पीडितांनी सहभाग घेऊन आपली आपबिती सांगितली होती. बॉलिवूडमध्येही या अभियानाचा प्रभाव दिसून आला होता. कारण बºयाच अभिनेत्रींनी त्यांच्याशी घडलेल्या अशा घटनेची जाहीर वाच्यता केली.