हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज सध्या त्याच्या आगामी 'मिशन इम्पॉसिबल ७' सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. त्याचे या सिनेमाचे शूटींग करतानाचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान तो सिनेमाच्या क्रूवर संतापलेला दिसला. कारण होतं कोविड-१९ सुरक्षेचे नियम तोडणं.
व्हरायटी डॉट कॉमला सिनेमाच्या प्रॉडक्शन टीमच्या एका सूत्राने सांगितले की, टॉम क्रूजला तेव्हा राग आला जेव्हा त्याला दिसलं की, क्रूमधील दोन मेंबर्स कोविड-१९ च्या गाइडलाईन तोडताना दिसले.
The Sun च्या रिपोर्टनुसार, क्रूजने बघितले की, दोन क्रू मेंबर कॉम्प्युटर स्क्रीनसमोर समोरासमोर एकमेकांच्या फार जवळ उभे आहेत. हे बघून टॉम क्रूज संतापला आणि म्हणाला की, जर मी तुम्हा दोघांना पुन्हा असं बघितलं तर कामाहून काढून टाकेन'. टॉम क्रूज संतापला तेव्हाचा ऑडीओही 'द सन'कडे उपलब्ध आहे. यात तो म्हणतोय की, आपल्यामुळे हे लोक हॉलिवूडमध्ये सिनेमे बनवण्यासाठी परतले आहेत. ते आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपण काय करतोय. तो म्हणाला की, आपण हजारो जॉब क्रिएट करत आहोत, मला हे असं पुन्हा बघायचं नाहीये'.
दरम्यान, टॉम क्रूज कोविड-१९ च्या गाइडलाईनबाबत फारच स्ट्रीक्ट आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो इटलीमध्ये एका बाइकवर स्टंट सीन शूट करताना दिसला होता. महत्वाची बाब म्हणजे यावेळी तो जी बाइक वापरत होता ती मेक इन इंडिया होती.
इटलीमध्ये शूटींग दरम्यान टॉम क्रूजला BMW G310 GS बाइक चालवताना बघितलं गेलं होतं. भारतात तयार झालेली ही बाइक अनेक देशांमध्ये एक्सपोर्ट केली जाते. कोरोनाच्या सुरूवातीला टॉमचा बाइकचा स्टंट करताना अपघातही झाला होता. ज्यामुळे 'मिशन इम्पॉसिबल ७'चं शूटींग बंद करावं लागलं होतं.