Join us

​टॉम क्रुझ पडला प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 8:21 PM

हॉलीवूड सुपस्टार आणि बॉक्स आॅफिस किंग टाम क्रुझ पुन्हा प्रेमात पडला आहे. सध्या डेट करत असलेल्या मुलीसोबत तो चांगलाच ...

हॉलीवूड सुपस्टार आणि बॉक्स आॅफिस किंग टाम क्रुझ पुन्हा प्रेमात पडला आहे. सध्या डेट करत असलेल्या मुलीसोबत तो चांगलाच सिरियस असून तिच्यासोबत सेटल होण्याचासुद्धा विचार करत असल्याचे कळतेय.टॉमचे हृदय पळवलेली ही मुलगी कोण याबाबत फारशी माहिती उपलब्ध नूसन ती इंग्लंडची रहिवासी आहे एवढेच ज्ञात आहे.टॉम यावर्षी जून महिन्यात जेव्हा ‘द ममी’ चित्रपटाच्या शूटींगसाठी लंडनमध्ये होता तेव्हा त्याची भेट या मुलीशी झाली. काही दिवसांच्या भेटीगाठीनंतर ते लंडनपासून दोन तासांच्या अंतरावर असणाऱ्या एका निसर्गरम्य खेड्यात फिरायलासुद्धा गेले होते.सुत्रांनुसार २०१२ मध्ये पूर्व पत्नी केटी होल्मशी घटस्फोट झाल्यानंतर तो प्रथमच एखाद्या मुलीच्या खऱ्या प्रेमात पडला आहे. दोघे बाईकवर फिरयला जातात तर कधी त्यांच्यासोबत टॉमची बहीणसुद्धा असते. ही रिलेशनशिप दीर्घकाळ टिकावी म्हणून तो मनापासून प्रयत्न करत आहे.अलिकडे टॉमचा ‘जॅक रिचर : नेव्हर गो बॅक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. समीक्षकांच्या जरी तो पचनी पडला नसला तरी त्याच्या स्टारव्हॅल्यूमुळे तिकिट खिडकीवर सिनेमाने चांगली कमाई केली. नुकतेच ‘जिमी किमेल शो’मध्ये त्याने ‘टॉप गन’चा सिक्वेल येणार असल्याचे सांगितले होते.