Join us

अखेर टॉम क्रुझने दिले ‘टॉप गन 2’चे सुतावेच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 1:32 PM

ऐंशीच्या दशकात तुफान लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे ‘टॉप गन’. जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे या चित्रपटाने टॉम क्रुझला जागतिक सुपरस्टार बनवले. आता ...

ऐंशीच्या दशकात तुफान लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे ‘टॉप गन’. जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे या चित्रपटाने टॉम क्रुझला जागतिक सुपरस्टार बनवले. आता पुन्हा एकदा या आयकॉनिक चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी तो सज्ज झाला आहे. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल तयार होणार असल्याचे खुद्द त्यानेच मान्य केले.जिमी किमेलच्या शोवर गप्पांच्या ओघात टॉमने सांगितले की, निर्माता जेरी ब्रुकहेमरशी मी या विषयी बोलणी करत असून लवकर तुम्हाला आनंदाची बातमी कळेल. तीस वर्षांपूूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘टॉप गन’मध्ये (१९८६) टॉमने पीट ‘मेव्हरिक’ मिशेल या पायलटची भूमिका केली होती.टॉप गन : पायलट पीट ‘मेव्हरिक’ मिशेलचित्रपटाच्या बाबतीत रंजक किस्से सांगताना टॉम विनोदाने म्हणाला की, मी आजतयागत दररोज हा चित्रपट पाहतो. मी माझ्या एजंटला सांगितले की, मला ‘टॉप गन २’ करायचा आहे परंतु आताच जेरीला याविषयी सांगू नको. सगळ्या गोष्टी जुळवून आल्यावरच आम्हाला अधिकृत माहिती जाहीर करायची आहे. टोनी स्कॉट दिग्दर्शित ‘टॉप गन’ हा १९८६ साली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. टॉमसह यामध्ये केली मॅकगिल्स  आणि वॅल किल्मर हेदेखील मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातील गाणी आणि संगीत आजतयागत लोकप्रिय आहेत. फिल्मचा अल्बमला ‘९ एक्स प्लॅटिनियम’ सर्टिफिकेशन आहे.टॉप कपाल : टॉम क्रुझ आणि केली मॅकगिल्स टॉमने स्वत: कबुल केल्यामुळे जगभरातील चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. लवकरात लवकर याविषयी अधिकृत घोषणा करण्यात यावी, अशी सोशल मीडियावर मागणी होत आहे. सध्या टॉमचा जॅक रीचर सिक्वेल ‘नेव्हर गो बॅक’ प्रदर्शित झालेला आहे.दरम्यान टॉमने विमान उड्डाणाचा थरार अनुभवण्यासाठी ‘ब्लु एंजल्स’ या विमानाची सफर केली. हे ‘एफ-१४’ विमान चालविण्याचे त्याने रीतसर प्रशिक्षणसुद्धा घेतले. तो सांगतो, अजुन दोन वेळा मला हे  विमान उडवायचे आहे. आवाजाच्या वेगापेक्षा दुप्पट स्पीडने उडण्याची मजाच काही और असते.