Join us  

​पेरी एडवर्ड्सने लगावली आरजेच्या कानाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 5:15 PM

ही घटनावाचून एवढे तरी निश्चित होईल की, सिंगर पेरी एडवर्डस्ला टेक्स्ट मेसेजवरून ब्रेक-अप करणे मुळीच आवडत नाही. अहो, का ...

ही घटनावाचून एवढे तरी निश्चित होईल की, सिंगर पेरी एडवर्डस्ला टेक्स्ट मेसेजवरून ब्रेक-अप करणे मुळीच आवडत नाही. अहो, का म्हणून काय विचारता? एका रेडिओ होस्टने जेव्हा तिला सांगितले की, त्याने मोबाईलवर मेसेज पाठवून त्याच्या प्रियकराशी असलेले नाते तोडले, तेव्हा ती एवढी भडकली की लागलीच त्याच्या कानशिलात लगावली. खरंच!‘लिटल मिक्स’ सिंगर पेरी फ्रान्समध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेथे तिची मुलाखत घेत असलेल्या एका फ्रेंच आरजेने (दुभाषकाच्या सहाय्याने) विनोदाने सांगितले की, मी टेक्स्ट मेसेज करून माझ्या पार्टनरसोबत ब्रेक-अप केले. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत पेरीने त्या आरजेच्या तोंडात चपराक लावून दिली.हे पाहून तो बिचारा आरजे पुरता हैराण झाला. त्याच्या जखमेवर मीठ चोळणारी गोष्ट म्हणजे तेथे उपस्थित सर्व लोकांनी तिच्या नावाचा एकच जयजय घोष सुरू केला. पण पेरीला एवढे चिडायचे कारण काय? भर कार्यक्रमात एखाद्याला अशी चापट मारण्या इतपत तिला का राग आला?                                                                                                स्सटॅक्क! : आरजेच्या श्रीमुखात लगावताना पेरी एडवर्डस्याचे कारण आहे की, अशाच प्रकारे तिला केवळ मेसेज पाठवून एका प्रियकराने ब्रेक-अप केले होते. तो प्रियकर दुसरा-तिसरा कोणी नसून ‘वन डिरेक्शन’ बँड सदस्य झेन मलिक आहे.एकेकाळी प्रेमांत आकांत बुडालेले पेरी-झेन यांचे काही काळापूर्वी ब्रेक झाले. झेनने तिला न भेटता फक्त मोबाईलवर टेक्स्ट पाठवून नाते संपूष्टात आणले होते.ब्रेक-अप के बाद : पेरी एडवर्डस् आणि झेन मलिकप्रियकराने इतक्या असंवेदनशिलतेने नाते तोडावे याचे तिला आजही दु:ख आहे. प्रेमामध्ये दुरावा येऊ शकतो. काही कारणाने नाते टिकवणे शक्य नसते. परंतु त्या नात्याचा मान राखून समोरासमोर बोलून त्याचा समारोप केला गेला पाहिजे, असे पेरीचे म्हणने आहे.