प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल मलिसा मूनी (maleesa mooney) हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मलिसा हिचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत फ्रिजमध्ये मृतदेह आढळून आला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर शवविच्छेदन अहवालानुसार, मलिसा दोन महिन्यांची गरोदर होती. सोबतच मृत्यूपूर्वी तिच्यावर जड वस्तूने आघात करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मलिसा हिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आलं. त्या मिळालेल्या रिपोर्टनुसार, मृत्यूपूर्वी मलिसाच्या शरीरावर जड वस्तूने हल्ला करण्यात आला. सोबतच तिने अल्कोहोल आणि कोकेनचं सेवन केल्याचं उघड झालं आहे. तिच्या शरीरात याचे काही अंश सापडले आहेत.
६ सप्टेंबर रोजी मलिसा अखेरची तिच्या अपार्टमेंटमध्ये दिली होती. त्यानंतर ती कुठेही दिसली नाही. मात्र, १२ सप्टेंबर रोजी तिचा थेट मृतदेह घरात आढळून आला. मलिसाच्या मृत्यूनंतर आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. तिच्या आयक्लाऊडवर एक अर्लट मेसेज आला होता. ज्यात तिचा मोबाईल अन्य कोणी तरी वापरत असल्याचं दिसून आलं. सध्या या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.