Join us  

पेरिसने दिले ट्रम्प यांना मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 2:22 PM

अमेरिकी राष्टध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे बाजी मारणाºया डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणाबरोबर सेलिब्रिटी जगतातही पॉप्युलर आहे. त्यामुळे कधी नव्हे ते यावेळच्या ...

अमेरिकी राष्टध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे बाजी मारणाºया डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणाबरोबर सेलिब्रिटी जगतातही पॉप्युलर आहे. त्यामुळे कधी नव्हे ते यावेळच्या राष्टध्यक्षपदाच्या निवडणुकीत नागरिकांप्रमाणेच हॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. अर्थात यामध्ये त्यांना विरोध करणाºयांचीच अधिक संख्या होती. प्रसिद्ध सोशलाइट पेरिस हिल्टन ही ट्रम्प यांच्या विजयाचे श्रेय स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तिच्या मते ट्रम्प यांच्या प्रचारात तिने योगदान दिले आहे. ‘गोल्ड रश’ या परफ्यूमच्या प्रचारासाठी गेल्या गुरुवारी आॅस्ट्रेलियन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पेरिसने सांगितले की, ट्रम्प यांच्या विजयात माझेही योगदान आहे. जेव्हा तिला तू ट्रम्प यांना मतदान केले का? असे विचारण्यात आले तेव्हा पेरिसने अतिशय धीरगंभीर आवाजात त्यांनाच मत दिल्याचे सांगितले. मी लहानपणापासून त्यांना ओळखते. त्यांना मी त्यांनाच मतदान करणार हे निश्चित होते, मात्र काही आठवड्यांपूर्वी पेरिसने या प्रश्नावर बोलणे टाळले होते. त्यामुळे तिच्या भूमिकेविषयी उत्सुकता वाढली होती. अखेर तिनेच याविषयी स्पष्टीकरण देत या प्रश्नाचा खुलासा केला आहे. ट्रम्प यांचा २००३ च्या मुलाखतीचा व्हिडीओ प्रचार काळात व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ट्रम्प यांनी म्हटले होते की, पेरिस १२ वर्षाची असतानापासून मी तिला ओळखतो. पेरिसचे कौतुक करताना ट्रम्प यांनी तिला सुंदर असे संबोधले होते. निवडणूक काळात याविषयावरून चांगलीच चर्चाही रंगली होती. त्यामुळे पेरिसने नेमके कोणाला मत दिले हे जाणून घेणे सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वपूर्ण होते. अखेर पेरिसने याविषयी खुलासा करून चर्चेला पूर्णविराम दिला आहे.