क्रिस रॉक (Chris Rock) ला मारल्यानंतर हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) चांगलाच वादात सापडला आहे. विल स्मिथने अकॅडमीच्या सदस्यतेचा राजीनामा दिला आहे. त्याआधी त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून क्रिसची माफी मागितली होती. ऑस्कर २०२२ मधील एक वेगळा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत असा दावा केला जात आहे की, विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ त्यावेळी हसत होती.
विल स्मिथने पत्नी जेड पिंकेट स्मिथच्या आजारावर जोक केल्याने कॉमेडिअन क्रिस रॉक याला एक कानशीलात लगावली होती. क्रिसचा जोक ऐकल्यावर जेडा नाराज झाली होती. ऑस्कर २०२२ च्या मंचावर जाऊन विल स्मिथने असं केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. विल स्मिथच्या कृत्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण आता नवीन व्हिडीओ समोर आला आहे. असा दावा केला जात आहे की, क्रिसला विल मारत असतान जेडा स्मिथ हसताना दिसत आहे.
हा व्हिडीओ कॉमेडिअन आणि अभिनेता मायकल रॅपापोर्टने इन्स्टाग्रामवर शेअर केला. विल आणि जेडा व्हिडीओत बसलेले दिसत आहेत. अशात क्रिस रॉकला मारून परत येत असताना जेडा पुढे होऊन मागे सरकते यावेळी असं वाटतं की, जेडा हसत आहे. पण हे व्हिडीओतून स्पष्ट होत नाही की, जेडा खरंच हसत आहे की नाही. कारण व्हिडीओ मागच्या बाजूने शूट करण्यात आला आहे. ज्यात जेडाचा चेहरा दिसत नाहीये.
ऑस्कर २०२२ चे प्रॉड्यूसर विल पॅकरने एका मुलाखतीत सांगितलं की, इव्हेंटच्या मंचावरच पोलीस विल स्मिथला अटक करणार होते. पण क्रिस रॉकने त्यांना असं करण्यास रोखलं होतं. बॅकस्टेज पोलिसांनी क्रिससोबत याबाबत चर्चा केली. पण तो म्हणाला होता की, तो ठीक आहे आणि त्याला विल स्मिथवर कोणताही गुन्हा दाखल करायचा नाहीये. विलने या कृत्यानंतर क्रिस, ऑस्करचे प्रोड्यूसर आणि प्रेक्षकांची माफी मागितली होती.