Join us  

मायकल जॅक्सनच्या मृत्यूचं काय होतं खरं कारण? गायकाच्या शेवटच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 1:12 PM

Michael Jackson: हॉलिवूडचा लोकप्रिय पॉप गायक मायकल जॅक्सन या जगात नाही, पण त्याच्या आवाजाची जादू आजही जगभरात कायम आहे. मायकल जॅक्सनच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला.

किंग ऑफ पॉप म्हणून ओळखला जाणारा हॉलिवूड गायक मायकल जॅक्सन (Michael Jackson) त्याच्या जादुई आवाजासाठी जगभर प्रसिद्ध होता. गायक १५ वर्षांपूर्वी त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. मायकलच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नंतर त्यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक दावे समोर आले. नुकतेच मायकलच्या शेवटच्या बॉडीगार्डने त्याच्या निधनाचे कारण सांगितले आहे.

मायकल जॅक्सनच्या मृत्यूचे गूढ आजही उकललेले नाही. तीव्र प्रोपोफोलच्या नशेमुळे गायकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सिंगरच्या हत्येचा आरोप वैयक्तिक चिकित्सक कॉनराड मरे यांच्यावर होता. अलीकडेच, मायकेल जॅक्सनचा बॉडीगार्ड बिल व्हिटफिल्ड याने खुलासा केला आहे की अनेक वर्षांपासून त्याला जाणीवपूर्वक मारण्यात आले की काय अशी शंका होती.

मायकेल जॅक्सनच्या मृत्यूचे कारण काय होते?हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, बिल यांनी मायकल जॅक्सनच्या निधनाबद्दल सांगितले, "मला वाटतंय का, की कोणाच्या तरी चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला? हो, मी या गोष्टीवर विचार करण्याचा खूप प्रयत्न केला. कोणीतरी हे जाणून बुजून केलंय का, असं असू शकतं का? टूर सुरू होण्यापूर्वी बरेच काही बदलले बोते. त्याच्या आयुष्यात आणखी काही लोक आले होते आणि हे खूप त्रासदायक झाले होते. तो खूप जास्त सराव करत होता. असं म्हणू शकतो की, हे सगळं त्यांना भारी पडले होते." मायकल जॅक्सन खूप तणावात होता आणि...बिल पुढे म्हणाला, त्याचा मृत्यू कोणाच्या हातून झाला का,''याचा विचार करणं माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मला नेहमी विचारले जाते की, मला काय वाटतं त्याचं निधन का झालं असेल आणि मी लोकांना खूप काही सांगितलं आहे. यात आमच्यापैकी अनेक जण सामील आहेत. तो पुढे म्हणाला की, मायकल जॅक्सन खूप तणावात होता आणि तणाव जीवघेणा असतो.'' माहितीसाठी, बिल तीन वर्षांपर्यंत मायकल जॅक्सनचा बॉडीगार्ड होता.