नोव्हेंबर ते डिसेंबर हा काळ म्हणजे हॉलीवूडमधील दर्जेदार चित्रपट प्रदर्शित करण्याचा असतो. उन्हाळ्यामध्ये अॅक्शन, सिक्वेल आणि सुपरहीरो चित्रपटांच्या भाऊगर्दीनंतर प्रेक्षकांना वेध लागतात ते ‘संभाव्य’ आॅस्कर सिनेमांचे. या दरम्यान सुरू होतो ‘आॅस्कर गेसिंग गेम’.गोल्डन स्टॅच्यू कोणाला मिळणार याविषयी तर्कवितर्क, चर्चा आणि गप्पांनी इंटरनेट फोरम्स भरून जातील. परंतु त्या आधी आगामी दोन महिन्यांत प्रदर्शित होणारे हे ११ सिनेमे दर्दी सिनेरसिकांनी पाहायलाच हवेत.
* मूनलाईटकृष्णवर्णीय समलिंगी तरुणाची गोष्ट सांगणारा ‘मूनलाईट’ सिनेमा म्हणजे ‘कन्फर्म’ आॅस्कर सिनेमा आहे अशी चर्चा आहे. बॅरी जेंकिन्स दिग्दर्शित या सिनेमात नेओमी हॅरिसची महत्त्वाची भूमिका असून तीन कलाकरांनी प्रमुख पात्र ‘चिरॉन’ची भूमिका साकारली आहे.
* हॅकसॉ रिजमेल गिब्सनचा बऱ्याच वर्षांनंतर दर्जेदार सिनेमा येतोय असे दिसतेय. गिब्सन दिग्दर्शित ‘हॅकसॉ रिज’ या चित्रपटात अँड्य्रू गार्फिल्ड दुसऱ्या महायुद्धात ‘मेडल आॅफ आॅनर’ सन्मान प्राप्त डॉक्टरची भूमिका करत आहे. ‘ब्रेव्हहार्ट’साठी गिब्सनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आॅस्क र पुरस्कार मिळालेला होता.
* अराईव्हलएमी अॅडम्स प्रमुख भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटात एलियन (परग्रही जीव) पृथ्वीवर अवतरल्यावर तिच्यावर त्यांची भाषा शिकून संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात येते. ‘हर्ट लॉकर’ फेम जेरेमी रेनरसुद्धा गणितज्ञच्या दमदार भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
* बिली लिन्स लाँग हाल्फटाईम वॉकदोन वेळा आॅस्कर विजेता दिग्दर्शक अँग लीच्या या सिनेमात एका १९ वर्षीय सैनिकाला इराक युद्धात आलेल्या अनुभवांची गोष्ट सांगण्यात आली आहे. ‘लाईफ आॅफ पाय’ प्रमाणेच ३-डी तंत्रज्ञाना वापर आणखी एक पायरी वर नेण्याचे काम या चित्रपटाद्वारे करण्यात आले आहे.
* मॅचेस्टरबाय द सीके सी अॅफ्लेक अभिनीत या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कुटुंबावर ओढावलेल्या एका दुर्दैवी प्रसंगानंतर केसीवर आपल्या भावाच्या मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी येते. एक जबरदस्त फॅमिली ड्राम यामध्ये पाहायल मिळणार, असे बोलले जातेय.
* नॉक्टर्नल अॅनिमलफॅशन डिझायनर टॉम फोर्डने दिग्दिर्शित केलेला ‘अ सिंगल मॅन’नंतर ‘नॉक्टर्नल अॅनिमल’ हा दुसरा सिनेमा आहे. जॅक जिलेनहाल आणि एमी अॅडम्सच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला हा चित्रपट यंदाच्या आॅस्करमध्ये धुमाकूळ घालणार, असे समीक्षकांचे म्हणने आहे.
* एलाईडकथेपेक्षा हा सिनेमा ब्रॅड पिट आणि मेरियन कोटिलार्ड यांच्या तथाकथित प्रेमसंबंधामुळे जास्त चर्चेत आहे. ब्रँजेलिनाचा संसार तुटण्यामागे मेरियन असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान घडणाऱ्या प्रेमकथेवर आधारित हा सिनेमा असून रॉबर्ट झेमेकिस हे दिग्दर्शक आहेत.
* लायनदेव पटेल ‘स्लमडॉग मिलेनियर’नंतर प्रथमच एका चांगल्या भूमिकेत ‘लायन’ नावाच्या सिनेमात दिसणार आहे. २५ वर्षांपूर्वी आॅस्ट्रेलियन दाम्पत्याने दत्तक घेतल्यानंतर आपल्या खऱ्या पालकांचा शोध घेण्यासाठी भारतात आलेल्या मुलाची ही कथा आहे. निकोल किडमन त्याच्या दत्तक आईच्या भूमिकेत आहे.
* ला ला लँडएमा स्टोन आणि रॅन गोस्लिंग अभिनीत आणि गायनाने नटलेल्या ‘ला ला लँड’ या सिनेमाबद्दल समीक्षक आणि चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. टोरोंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये तर चित्रपटाला ‘पिपल्स चॉईस अॅवार्ड’ मिळाला आहे. तसेच स्टोनला व्हेनिस फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळालेला आहे.
* पॅसेंजर्सजेनेफर लॉरेंस आणि क्रिस पॅट यांना अंतराळात रोमांस करताना पाहायला कोणाला आवडणार नाही. दोन अंतराळवीरांची प्रेमकथा म्हणजे ‘पॅसेंजर्स’. ट्रेलरवरून तरी हा चित्रपट जबरदस्त वाटत आहे. एका दीर्घकालीन मिशनवर निघालेल्या स्पेस प्रवाशांची प्रेम कहाणी यामध्ये दाखविण्यात आली आहे.
* सायलन्समार्टिन स्कॉरसेसी म्हटले की, सिनेमाच्या दर्जाविषयी वेगळे काहीच सांगायला नको. ‘सायलन्स’ चित्रपटाच्या पटकथेवर तो १९६६ पासून काम करत आहे. लियाम नेसन आणि अँड्य्रू गार्फिल्ड अभिनीत हा चित्रपट १७व्या शतकात जपानमध्ये अनाहुत अत्याचार झालेल्या ख्रिश्चन मिशनरीच्या जीवनावर आधारित आहे.