Join us

होप टूवर्ड्स लाइफ शूड नेव्हर डाय

By admin | Published: July 22, 2015 2:13 AM

महाराष्ट्राचे लाडके आणि तरुण-तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राजकारणाच्या गर्दीत रसिकता जपणारा माणूस. आयुष्याच्या व्यग्रतेतही स्वत:मधील

महाराष्ट्राचे लाडके आणि तरुण-तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राजकारणाच्या गर्दीत रसिकता जपणारा माणूस. आयुष्याच्या व्यग्रतेतही स्वत:मधील दर्दीपण ते जपतात. आता सिनेमा बघायला वेळ मिळत नाही, पण विमानप्रवास असो की कुटुंबाबरोबरचे क्षण... जरा निवांतपणा मिळाला की ओठांवर लगेच गाणी येतात. नव्या पिढीच्या या नेत्याशी आज त्यांच्या वाढदिवशी साधलेला हा हटके अन् तितकाच मनमोकळा संवाद....मुख्यमंत्री फडणवीस यांचा आज वाढदिवस कायद्याची पदवी घेऊनही राजकारणाला आपले कर्मक्षेत्र बनविणारे व अफाट परिश्रमाच्या बळावर राज्याचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा थक्क करणारा राजकीय प्रवास अनुभवणारे देवेंद्र फडणवीस यांचा आज ४५ वा वाढदिवस आहे.  

 

< आपला आवडता अभिनेता/अभिनेत्री कोण?सीएम - अमिताभ बच्चन आणि काजोल. महानायक अमिताभ यांची गोष्टच निराळी आहे. आपल्या अलौकिक अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. मला ते खूप आवडतात. काजोल एक गुणी अभिनेत्री आहे. तिचा अभिनय अगदी नैसर्गिक वाटतो.

< आपलं आवडतं गाणं कोणतं?सीएम - किशोरकुमारची सगळी गाणी.याशिवाय तेरी दिवानी (कैलाश खेर), तुमसेही..., सुन रहा है ना तु, रिमझिम रिमझिम ही गाणी आजही मनाला भावतात.

< आॅल टाइम फेवरिट सिनेमा कोणता?सीएम - जाने भी दो यारों... अतिशय तरल कथानक लाभलेला हा सिनेमा मला खूप भावला.

< आता आपण सिनेमा बघता का?सीएम - नाही... कामाचा व्याप इतका वाढला आहे की आता सिनेमा बघायला वेळच मिळत नाही.

< आपला आवडता गायक आणि संगीतकार कोण?सीएम - ही दोन्ही नावं निश्चितचहिंदी चित्रपटसृष्टीतील मोठी नावं आहेत. किशोरकुमार आणि आर. डी. बर्मन.

< मराठी सिनेमाने कात टाकली आहे. सध्याच्या मराठी सिनेमाबद्दल आपलं मत काय?सीएम - हिंदी चित्रपटसृष्टीच्या वटवृक्षाखाली मराठी चित्रपटसृष्टीचा छोटा वृक्ष नष्ट होऊ नये, ही माझी प्रामाणिक भावना आहे. मराठी सिनेमा जागतिक दर्जाचाच आहे. आज त्याच्या पुढे हिंदी सिनेमाचे आव्हान आहे हे मान्य, पण मराठी चित्रपटाचा विकास उत्तमरीतीने होत आहे.

< तनू वेड्स मनू, बाहुबली आणि बजरंगी भाईजान हे चित्रपट चर्चेत आहेत. आपण यातील एखादा सिनेमा बघितला का?सीएम - तनू वेड्स मनू बघितला होता. तनू वेड्स मनू रिटर्न बघितला नाही. बाकीच्या दोन चित्रपटांबद्दल मीही ऐकले आहे. पण पाहण्याचा योग अजून आला नाही.

< एखाद्या चित्रपटावर दिग्दर्शकाचे पूर्ण नियंत्रण असते तसेच एका मुख्यमंत्र्याचे राज्यावर नियंत्रण असते. आपल्याला या दोन्हींमध्ये काही साम्य दिसते का?सीएम - दिग्दर्शक कितीही चांगला असला तरीही सिनेमाचे यश हे एक टीम इव्हेंट असते. त्यातील कथानक, संगीत आणि कलावंतांचे जसे काम असते तसेच सरकारचेही आहे. मुख्यमंत्री, त्यांचे सहकारी मंत्री, नोकरशाही, स्थानिक संस्था यांच्या एकत्रित कामगिरीतून यशापयश ठरत असते.

< हिंदी/मराठी चित्रपटसृष्टीकडून आपल्या काही अपेक्षा वा संदेश?सीएम - बी इनोव्हेटिव्ह. यूज टेक्नॉलॉजी, पास्ट, प्रेझेंट आणि फ्यूचरचे प्रतिबिंब सिनेमात उमटायला हवे. भारतीय माणूस केवळ सिनेमा बघत नाही तर जगतो. त्यामुळे लक्षात ठेवा, द होप टुवडर््स लाइफ शूड नेव्हर डाय.