Join us

क्षितिज म्हणतो, मालिकांमध्ये नाही इंटरेस्ट

By admin | Published: July 01, 2015 3:59 AM

मूळ पुण्याचा असलेल्या क्षितिज पटवर्धन या मराठमोळ्या मुलाच्या लेखणीने मराठी रंगभूमीसह चित्रपटसृष्टीचे अवघं जग व्यापलं आहे. उत्कृष्ट कथा-संवाद यावर पुरस्कारांची मोहोरही

मूळ पुण्याचा असलेल्या क्षितिज पटवर्धन या मराठमोळ्या मुलाच्या लेखणीने मराठी रंगभूमीसह चित्रपटसृष्टीचे अवघं जग व्यापलं आहे. उत्कृष्ट कथा-संवाद यावर पुरस्कारांची मोहोरही त्याने उमटविली आहे, नाट्य-चित्रपट क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणारा क्षितिज मालिकांपासून मात्र जाणीवपूर्वक दूर राहिला आहे, तो का? मराठीतील अनेक मालिकांची क्रेझ सध्या घराघरांत पोहोचली आहे. विशिष्ट प्रसंगांपासून ते पुढे काय घडणार यापर्यंत सर्वत्र अगदी कॉलेज कट्ट्यावरदेखील चर्चा घडत आहेत. तरीही मालिकांच्या लेखनाला स्पर्श करण्याची इच्छा का झाली नाही, हे सांगताना क्षितिज म्हणतो, ‘‘आजच्या मालिका या डिमांडिंग आणि चॅलेंजिंग आहेत. मालिका लिहिण्यासाठी चांगले स्किल तुमच्याकडे पाहिजे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे वेळ... आणि तितका वेळ मी मालिकांसाठी देऊ शकत नाही. मालिका लिहिण्याचा माझा स्वभाव अणि टेम्प्रामेंट नाही. शिवाय लेखक म्हणून स्वत:ची वेगळी ओळख मला करायची आहे. सध्यातरी चित्रपट, अ‍ॅडव्हरटायझिंग आणि इव्हेंट यासाठीच लेखन करणार आहे.’’क्लासमेट, हॅपीजर्नी, टाईमपास या चित्रपटांसाठी त्याने गाणी लिहिली आहेत. पत्रकारांच्या जीवनावरील ‘दोन स्पेशल’ या नाटकामध्ये जितेंद्र जोशी आणि गिरिजा ओक प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. या नाटकाचे लेखन क्षितिजने केले असून, अनमोल भावे यांनी साऊंड डिझायनिंग केले आहे. नाटकातील छोटे छोटे प्रसंग ध्वनिरेखाटनाद्वारे जिवंत करण्यात आले असल्याचे क्षितिज सांगतो.