Join us

हॉटेल मुंबईचे हे खास गाणे तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 6:00 AM

मुंबई हॉटेल या चित्रपटाचा विषय योग्यप्रकारे मांडणारे गीत बनवावे असे या चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटत होते. त्यातूनच या गाण्याची निर्मिती झाली.

ठळक मुद्देभारतीयांच्या एकात्मतेचे आणि मानवतेचे चित्रण या गाण्याद्वारे करण्यात आले आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी हॉटेल मुंबई या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

मुंबई हॉटेल या चित्रपटाला जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक खास गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आले आहे. सनी इंदरने संगीत दिलेले हे गाणे स्टेबिन बेनने गायले आहे. हे गाणे प्रचंड एनर्जेटिक असून देशभक्तीपर हे गीत लोकांना आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. हे गाणे कुमार यांनी लिहिले असून हे गाणे खूप वेगळ्याप्रकारे मांडण्यात आले आहे.

मुंबई हॉटेल या चित्रपटाचा विषय योग्यप्रकारे मांडणारे गीत बनवावे असे या चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटत होते. त्यातूनच या गाण्याची निर्मिती झाली. भारतीयांच्या एकात्मतेचे आणि मानवतेचे चित्रण या गाण्याद्वारे करण्यात आले आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी हॉटेल मुंबई या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये काही बंदुकधारी व्यक्ती घुसले आणि त्यांनी लोकांवर अमानुषपणे गोळीबार करायला सुरुवात केली होती. त्यातून काहींनी आपल्या प्राणाची पर्वा न करता इतरांचे प्राण कशाप्रकारे वाचवले हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात देव पटेल, अनुपम खेर, आर्मी हैमर, नाजनीन बोनियाडी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हॉटेल मुंबई या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते झी स्टुडिओज आणि पर्पल एन्टरटेन्मेंट असून हा चित्रपट 29 नोव्हेंबर 2019 ला इंग्रजी, हिंदी, तमीळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :हॉटेल मुंबईअनुपम खेरदेव पटेल