Join us

सेक्स दाखवायचा आहे तर पॉर्न फिल्मच बनवा, असे सिनेमा बनवणा-यांवर भडकला होता गोविंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 7:43 PM

Govinda Filmy Carrier In Bollywood: हसत हसत का होईना  गोविंदानं कटू सत्य अखेर बोलूनच दाखवले होते. जर सेक्सच दाखवायचा आहे तर पॉर्न फिल्मच बनवा असेही तो म्हणाला होता.

बॉलीवुडचा हिरो नंबर वन अभिनेता अशी गोविंदाची ओळख. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्या अभिनेत्यावर रसिक आजही जीवापाड प्रेम करतात अशा मोजक्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या अभिनयासह स्टाईल, डान्स, कॉमेडी आणि रोमान्सने गोविंदाने रुपेरी पडद्यावर धम्माल उडवली. 80 आणि 90च्या दशकात तर गोविंदाचाच बोलबाला होता. त्यामुळंच की काय त्याला हिंदी चित्रपटसृष्टीचा नंबर वन अशी उपाधी रसिकांनी देऊन टाकली. त्याच्या या अभिनयाच्या जोरावर त्याला विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे. 

 

गोविंदाच्या सिनेमासाठी रसिक आतुरतेने कधी काळी वाट पाहायचे... मात्र बराच काळ गोविंदाचा कोणताही सिनेमा रसिकांच्या भेटीला आलेला नाही. गोविंदाला काम मिळणेही बंद झाले आहे. खुद्द गोविंदानेच ही गोष्ट बोलून दाखवली होती. बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा फटका गोविंदालाही बसला आहे. बॉलिवूडमध्ये ठराविक लोकांनाच अजूनही ऑफर्स मिळतात बाकी कलाकार घरीच बसून आहेत. अनेकदा अशा ऑफर्स येतात ज्या तो करु शकत नाही.बॉलिवूड सिनेमात मनोरंजनाच्या नावाखाली सुरु असलेला सेक्सचा भरना पाहून गोविंदा भडकला होता. हसत हसत का होईना  गोविंदानं कटू सत्य अखेर बोलूनच दाखवले होते. जर सेक्सच दाखवायचा आहे तर पॉर्न फिल्मच बनवा असेही तो म्हणाला होता.

अनेकदा गोविंदाला अशा भूमिका ऑफर झाल्या ज्या त्याला करणे पसंतच नव्हते. ऑफर झालेल्या सिनेमात बोल्ड सीन्सचाच भरणा जास्त होता. मला अशा सिनेमांच्या ऑफर स्विकारण्यापेक्षा नकार देणेच योग्य वाटल्याचे गोविंदाने सांगितले होते.दिलेल्या मुलाखतीत अनेकदा गोविंदाने यावर वाचा फोडली होती. सुरूवातीपासून स्वतःच्या नियमांवर काम केले आणि त्याच ताकदीवर यशही मिळवले. जर तो एखाद्या मोठ्या ग्रुपशी संबंधित असला असता तर त्याला चांगले सिनेमेही मिळाले असते. बॉलिवूड एक मोठे कुटुंबासारखे आहे. सगळ्यांनुसार आपण वागले तर तुम्ही सर्वांसाठी चांगले बनता.

टॅग्स :गोविंदा