‘परदेस’ या चित्रपटामुळे एका रात्रीतून स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. पहिल्याच सिनेमात महिमाला बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. बॉक्स ऑफिसवरही महिमाचा पहिला डेब्यू सिनेमा यशस्वी ठरला. पण या यशाचा तिच्या करिअरला फारसा फायदा झाला नाहीच. गेल्या अनेक वर्षांपासून महिमा बॉलिवूडमध्ये कुठेही नाही.
महिमा चौधरीने २००६ साली मुंबईतील आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांतच तिने मुलीला जन्म दिला. महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, अशी चर्चा यानंतर रंगली. पण आता महिमा बॉबीपासून विभक्त झाली आहे. २०१३ मध्ये बॉबी आणि महिमा विभक्त झाले. आता महिमा सिंगल मदर म्हणून मुलांचा संभाळ करते.