Join us

RRR साठी आलियाला मिळालं किरकोळ मानधन; इतर कलाकारांची फी ऐकून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 6:30 PM

RRR: या चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर या सुपरस्टारसोबतच बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आलिया भट्ट झळकणार आहेत.

बाहुबलीच्या अपार यशानंतर एस.एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांचा RRR हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजामौली यांचे चित्रपट खासकरुन भव्यदिव्य सेट, तगडी स्टारकास्ट आणि उत्तम कथानक यामुळे चर्चेत असतात. त्यामुळे आगामी RRR या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहे. या चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर या सुपरस्टारसोबतच बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आलिया भट्ट झळकणार आहेत. यात या चित्रपटासाठी आलियाने घेतलेलं मानधन समोर आलं आहे.

राजामौली यांचा RRR हा चित्रपट ७ जानेवारी २०२२ मध्ये प्रेश्रकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य कलाविश्वातील तगडी स्टारकास्ट झळणार असल्यामुळे अनेकांचं लक्ष या चित्रपटाकडे वेधलं आहे. विशेष म्हणजे या सुपरस्टार्सनी चित्रपटासाठी तगडं मानधन घेतलं असून त्यांच्या तुलनेत आलियाला किरकोळ मानधन मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

RRR या चित्रपटामध्ये रामचरण मुख्य भूमिकेत झळकणार असून यासाठी त्याला ४५ कोटी रुपये मानधन देण्यात आलं आहे. त्याचसोबत अभिनेता ज्युनिअर एनटीआरदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण साकारत असल्यामुळे त्यालादेखील ४५ कोटी रुपये मानधन देण्यात आलं आहे. मात्र, या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या तुलनेत आलियाला अत्यंत कमी मानधन मिळालं आहे.

किती मिळालं आलियाला मानधन?

RRR या चित्रपटात आलिया, सीतेची भूमिका साकारत आहे. ही भूमिका चित्रपटात अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र,तरीदेखील यासाठी आलियाला केवळ ९ कोटी रुपये देण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने अजय देवगणदेखील दिग्दर्शक राजामौली यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करतोय. या चित्रपटासाठी अजयने २५ कोटी रुपये घेतले असून या चित्रपटाच्या निमित्ताने तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

टॅग्स :आलिया भटसिनेमासेलिब्रिटीTollywoodबॉलिवूड