काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी राजकुमार राव (rajkumar rao) आणि पत्रलेखा (patralekhaa) या दोघांनी लग्नगाठ बांधली. जवळपास ११ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आणि, चंदीगढमधील एका रिजॉर्टमध्ये साताजन्माची गाठ बांधली. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची तुफान चर्चा रंगली होती. अखेर लग्न झाल्यावर राजकुमार आणि पत्रलेखा यांनी इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. लग्नसोहळा आटोपल्यानंतर नुकतेच हे दोघं मुंबईत आले आहेत. विशेष म्हणजे विमानतळावर या दोघांना पाहिल्यावर फोटोग्राफर्सने पत्रलेखाला भाभीजी म्हणत हाक मारली.
सध्या सोशल मीडियावर पत्रलेखा आणि राजकुमार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राजकुमार आणि पत्रलेखा विमानतळावर दिसत आहे. विशेष म्हणजे पत्रलेखाने लाल रंगाची साडी नेसली होती. तर राजकुमारही इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये असल्याचं पाहायला मिळालं.
पत्रलेखा आणि राजकुमार यांना पाहिल्यावर अनेक फोटोग्राफर्स त्यांचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी पत्रलेखाचं कॅमेराकडे लक्ष वेधलं जावं यासाठी काही फोटोग्राफर्सने तिला 'भाभाजी' अशी हाक मारली. विशेष म्हणजे पत्रलेखाला भाभीजी म्हटल्यावर राजकुमार आणि तिला हसू आलं. या दोघांनीही एकमेकांकडे पाहून गोड स्माईल दिली.
दरम्यान, फोटोग्राफर्सने पत्रलेखाला भाभीजी म्हटल्यावर राजकुमारलादेखील हसू आलं. त्याने सुद्धा फोटोग्राफर्सकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं. लग्नानंतर ही जोडी मुंबईत परतली असून दोघंही त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे वळले आहेत. त्यामुळे ही जोडी इतक्या हनीमुनसाठी कोणत्याही नव्या ठिकाणी फिरायला जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.