Join us

अर्सलनच्या पोस्टवर सुजैन खानची ‘सुपर’ कमेंट, पुन्हा सुरु झाल्या प्रेमाच्या चर्चा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 11:00 AM

अर्सलनच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर सुजैनची कमेंट तुम्हाला दिसेलच दिसेल. तिची अशीच एक कमेंट सध्या लक्ष वेधून घेतेय.

ठळक मुद्देअर्सनल हा ‘बिग बॉस 14’ फेम अली गोनीचा भाऊ आहे. तो एक अभिनेता आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) एक्स-वाईफ सुजैन खान (Sussanne Khan ) पुन्हा चर्चेत आहे. सध्या सुजैनच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. होय, सुजैन ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक अली गोनीचा भाऊ व अभिनेता अर्सलन गोनीला (Arslan Goni) डेट करत असल्याचे मानले जात आहे. आता तर या चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. अर्सलनच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर सुजैनची कमेंट तुम्हाला दिसेलच दिसेल. तिची अशीच एक कमेंट सध्या लक्ष वेधून घेतेय.

तर अर्सलनने कोरोना लस घेतानाचा एक व्हिडीओ नुकताच शेअर केला. त्याच्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्स आल्यात. पण एक कमेंट विशेष ठरली. या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही कमेंट होती, सुजैनची. सुजैनने यावर ‘सुपर’ असे लिहिले. शिवाय काही इमोजीही पोस्ट केलेत.

चर्चा खरी मानाल तर गेल्या सहा महिन्यांपासून अर्सलन व सुजैन एकमेकांच्या संपर्कात असल्याचे आणि काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. काही कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून सुजैन-अर्सलन यांची भेट झाली होती. हे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. देहबोलीवरून या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा वेगळे नाते असल्याचे स्पष्टपणे दिसते. आता ही चर्चा किती खरी, ते येणा-या दिवसांत कळेलच. तूर्तास तरी सुजैन व अर्सलन यांनी यावरही काहीही वक्तव्य केलेले नाही.

मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी चर्चा होती. मात्र हृतिकने हे वृत्त फेटाळून लावले होते. आम्ही आता पुन्हा एकत्र येणे शक्य नाही, असे त्याने एका मुलाखतीत म्हटले होते. सुजैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपला मार्ग वेगळा केला होता. मात्र घटस्फोट झाल्यानंतर ही दोघांमध्ये मैत्रीचे नातं कायम राहिले. दोघांना अनेक वेळा व्हॅकेशनवर आणि बर्थ डे पार्टीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले.

ह्रतिकने 2000 मध्ये  ‘कहो ना प्यार है’ मधून डेब्यू केल्यानंतर त्याचवर्षी लग्न केले होते. सुजैन आणि हृतिकची बॉन्डिंग ब-याचदा सोशल मीडियावरही पाहायला मिळते. हृतिक जेव्हा जेव्हा अडचणीत दिसतो तेव्हा सुजैनने सोशल मीडियावर त्याला सपोर्ट करताना दिसते. 

कोण आहे अर्सलनअर्सलन हा ‘बिग बॉस 14’ फेम अली गोनीचा भाऊ आहे. तो एक अभिनेता आहे. 2017 साली ‘जिया और जिया’ या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता.  अर्सलन लवकरच अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे.  

टॅग्स :सुजैन खानहृतिक रोशन