Join us

तुमचं बालपण कसं होतं? चाहत्याच्या प्रश्नाला ‘राम’ यांनी दिले ‘हे’ उत्तर!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 7:00 PM

रामायण, महाभारत या व अशा अनेक एकेकाळी गाजलेल्या मालिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या. विशेषत: रामायण या मालिकेने तर प्रेक्षकांना वेड लावले. इतके की, या मालिकेने टीआरपीचे सगळे विक्रम मोडीत काढले.

दुरदर्शन वाहिनीवर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेचे पुन:प्रक्षेपण संपले आहे. या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडित काढले. आजही चाहते या मालिकेवर प्रचंड प्रेम करतात. प्रभु श्रीराम यांची भूमिका साकारलेल्या अभिनेता अरूण गोविल यांनी नुकतेच त्यांच्या चाहत्यांसोबत #ASKARUN  हे ऑनलाईन  सेशन  घेतले. या सेशनमध्ये चाहत्यांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. एकाने विचारले आमचे बालपण तुमच्यामुळे खुप छान गेले. मात्र, तुमचे बालपण कसे होते? यावर त्यांनी ‘हे’ उत्तर दिले.

अरूण गोविल म्हणाले,‘माझे बालपणही प्रभू श्रीराम यांच्यामुळे खुपच अविस्मरणीय झाले. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम होता. आम्ही रोजच रामायणचा पाठ करत होतो. जय श्रीराम...’ अशाप्रकारे वेगवेगळया उत्सुकतावर्धक अशा प्रश्न उत्तरांनी हे सेशन चांगलेच रंगले. त्यानंतर एका चाहत्याने विचारले,‘देवा, कोरोना व्हायरसपासून केव्हा सुटका होईल?’ त्यावर ते म्हणाले,‘सर्वांचे प्रयत्न सुरूच आहेत. लवकरच भारत कोरोनामुक्त होईल, यात काही शंका नाही.’ 

‘रामायण’ मालिका संपणार या विचारानेच चाहते नाराज झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनवर अनेक जुन्या मालिका सुरु झाल्यात. रामायण, महाभारत या व अशा अनेक एकेकाळी गाजलेल्या मालिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या. विशेषत: रामायण या मालिकेने तर प्रेक्षकांना वेड लावले. इतके की, या मालिकेने टीआरपीचे सगळे विक्रम मोडीत काढले. साहजिकच रामायणमधील सगळे कलाकार सध्या चर्चेत आहेत. प्रभु रामचंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते अरूण गोविल यांची तर सर्वाधिक चर्चा आहे. 

टॅग्स :रामायणटेलिव्हिजन