Join us

ह्रतिकने केला सलमानचा अपमान...

By admin | Published: June 25, 2016 6:53 AM

सलमान खान आणि ह्रतिक रोशनचा वाद किती विकोपाला गेला आहे, या दोघांमधला पंगा आता पुन्हा एकदा नव्यानं पुढे आला आहे. याची प्रचिती आयफा सेरेमनीत दिसून आली.

ऑनलाइन लोकमत
मॅड्रिड : सलमान खान आणि वाद यांचे जुने नाते आहे. त्याची प्रसिद्धी वाढतेय तसेच त्याचे वादही वाढताहेत. सलमान खान आणि ह्रतिक रोशनचा वाद किती विकोपाला गेला आहे, या दोघांमधला पंगा आता पुन्हा एकदा नव्यानं पुढे आला आहे. याची प्रचिती आयफा सेरेमनीत दिसून आली. यांचा वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. आयफाच्या पत्रकार परिषदेसाठी ह्रतिकने सलमान सोबत स्टेज शेअर करायला नकार देऊन एकप्रकारे त्याचा अपमानच केला आहे. 
मॅड्रिडमध्ये आयफाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला दीपिका पादूकोण, शाहिद कपूर, सलमान खान, प्रियांका चोप्रा, सलमान खान आणि हृतिक रोशन पोहोचले, पण सलमान तिथे असल्याने हृतिकने स्टेजवर जायला नकार दिला. 

सलमान म्हणजे वादांचा ‘सुल्तान’

हृतिक रोशन आणि सलमान एकमेकांशी बोलतही नाहीत आणि जर कोणत्या पुरस्कार सोहळ्याला हे दोघं एकत्र आले तरी एकमेकांना टाळतात. हृतिकचा चित्रपट गुजारिशवर सलमाननं टीका केली होती. गुजारिश चित्रपट बघायला कुत्रापण जाणार नाही, असं सलमान म्हणाला होता. आता या टीकेचा बदला हृतिकनं सलमानचा अपमान करून घेतल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

आता मला कमी बोलायला हवं - सलमान खान