Join us

हतिक रोशन आणि श्वेता नंदाच्या अफेअरची झाली होती मीडियात चर्चा, कंगनानंतर हृतिकच्या आयुष्यात आली होती श्वेता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:14 PM

श्वेता आणि हृतिक हे लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहेत. पण लग्नानंतर ते दोघे आपापल्या आयुष्यात बिझी असल्याने ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. पण कंगनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दोघे अनेक पार्टी, इव्हेंटमध्ये एकत्र जात होते.

ठळक मुद्देकुणाल कपूरच्या लग्नात श्वेता आणि हृतिकची अनेक वर्षांनी पुन्हा भेट झाली अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. पण कंगनाच्या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर श्वेताने हृतिकपासून दूर राहाणेच पसंत केले असे देखील म्हटले जाते.

अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा आज (17 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करतेय. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नाते नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते.

फिल्मी दुनियेतील ग्लॅमरसोबत लहानाची मोठी झालेली श्वेता ज्वेलरी डिझायनर असून या क्षेत्रात तिने चांगलीच प्रगती केली आहे. श्वेताची आई आणि वडील दोघेही अभिनयक्षेत्रात असले तरी तिने नेहमीच अभिनयापासून दूर राहाणेच पसंत केले. ती आई-वडिलांसोबत फिल्मी पार्ट्यांना हजेरी लावत असली तरी कॅमेऱ्यासमोर न येण्याचेच तिने ठरवले होते.

श्वेता नंदा काही वर्षांपूर्वी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली होती. कंगना रणौत आणि हृतिकचे ब्रेकअप झाल्यानंतर श्वेतासोबत हृतिक नात्यात होता असे म्हटले जाते. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर हृतिकच्या आयुष्यात श्वेता आली. श्वेता आणि हृतिक हे लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहेत. पण लग्नानंतर ते दोघे आपापल्या आयुष्यात बिझी असल्याने ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. पण कंगनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हृतिक आणि श्वेता अनेक पार्टी, इव्हेंटमध्ये एकत्र जात होते. केवळ प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात त्यांना कैद केले जाऊ नये याची ते काळजी घ्यायचे. बच्चन कुटुंब आणि हृतिकचे खूप जवळचे नाते आहे. अभिषेक बच्चन आणि हृतिक देखील खूप चांगले फ्रेंड्स आहेत. कुणाल कपूरच्या लग्नात श्वेता आणि हृतिकची अनेक वर्षांनी पुन्हा भेट झाली अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. पण कंगनाच्या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर श्वेताने हृतिकपासून दूर राहाणेच पसंत केले असे देखील म्हटले जाते.

श्वेताने निखिल नंदासोबत लग्न केले असून त्यांना दोन मुलं आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून निखिल दिल्ल्लीत तर श्वेता अधिकाधिक काळ मुंबईत राहाते. त्यामुळे त्यांच्यात काही प्रोब्लेम सुरू आहेत अशा देखील चर्चांना ऊत आले होते. पण निखिलची आई रितू नंदा यांच्या निधनानंतर श्वेता आणि निखिल यांना पुन्हा एकत्र पाहाण्यात आले. अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब निखिलच्या या दुःखात त्याच्या पाठिशी उभे राहिले होते.

टॅग्स :हृतिक रोशन