सुजैन खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी शेअर करताना दिसते. याच दरम्यान सुजैन एक लक्षवेधी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे सुजैन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोसोबत सुझान कॅप्शन सुद्धा दिले आहे. सुजैनच्या या फोटोवर एक्स पती ह्रतिक रोशनने सुद्धा कमेंट केली आहे.
लॉकडाऊनमध्ये आले एकत्रसुजैन व हृतिकचा घटस्फोट झालाय. पण लॉकडाऊनपासून सुजैन हृतिकच्या घरी राहतेय. मुलांसाठी तिने हा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात माझ्या दोन्ही मुलांना आई व बाबा दोघांची गरज आहे. अशावेळी मी त्यांना एकटे सोडू शकत नाही. लॉकडाऊन आहे तोपर्यंत मी माझ्या मुलांसोबतच राहणार असे सुजैनने म्हटले होते.