Join us

जिंकलस भावा..! हृतिक रोशनने दिलं २० वर्षीय भारतीय बॅले डान्सरच्या स्वप्नाला बळ

By तेजल गावडे | Published: September 22, 2020 7:45 PM

हृतिक रोशनने एका वीस वर्षीय भारतीय बॅले डान्सरचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मात्र आता त्याने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची चर्चा होताना दिसते आहे. हृतिक रोशनने एका वीस वर्षीय भारतीय बॅले डान्सरचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

कमल सिंग हा एक 20 वर्षीय बॅले डांसर असून दिल्लीतील विकासपुरीमधील एका ई-रिक्शा चालकाचा मुलगा आहे. तो लंडन मधील एका प्रतिष्ठित इंग्लिश नॅशनल बॅले स्कूलमध्ये प्रवेश मिळवणारा पहिला भारतीय डांसर आहे. मात्र, अपुऱ्या पैशांअभावी आपले स्वप्न पूर्ण करण्यास आणि ते वास्तवात आणण्यास असमर्थ होता. मात्र हृतिक रोशनने त्याला आर्थिक मदत करून त्याच्या स्वप्नाला बळ दिले आहे.

कमलचे शिक्षक फर्नांडो गुइलेरा यांनी आपल्या इंस्टाग्रामवर ह्रितिकला त्याच्या उदारतेबद्दल धन्यवाद दिले ज्यामुळे कमलला आपले लक्ष्य प्राप्त करण्याचा जवळ नेले आहे. त्यांनी ह्रितिकने केलेल्या मदतीचा एक स्नॅपशॉट शेअर करत आभार मानले. 

हृतिकच्या सोशल मीडिया टाइम लाइनवर एक नजर टाकली तर ती अशाच कौतुकाच्या अनेक प्रशंसनीय पोस्टने भरलेली दिसेल. मग ते डांस/सिंगिंग/ मिमिक्री/पेंटिंग सारखी कोणतीही कला असो, त्याच्या प्रोफाइलवरून ते त्यांचासाठी व्यक्तिगत नोट्स/लाइक्स आवर्जून करण्यात येते. 

निश्चितच, हृतिक टॅलेंट खूप चांगल्या तऱ्हेने ओळखतो आणि त्यांच्या प्रतिभेला जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. हृतिक कधीच युवा प्रतिभांचे समर्थन करण्यामध्ये कसर सोडत नाही आणि नेहमीच त्यांना प्रेम आणि प्रोत्साहन देतो. योग्य प्रतिभेला पुढे नेण्यास आणि त्यांना त्यांचे क्षीतिज प्राप्त करून देण्यात मदत करण्यासाठी हृतिकला खऱ्या आयुष्याचा हीरो मानले जाते.

टॅग्स :हृतिक रोशन