शाहरुख खान आणि हृतिक रोशन 'कभी खुशी कभी घाम' या सिनेमात भावांची भूमिका साकरली होती. जी प्रेकक्षकांना फार आवडली होती. फार कमी लोकांना हे माहिती आहे की यानंतर हृतिकने पुन्हा शाहरुखच्या धाकट्या भावाची भूमिका साकारण्यास नकार दिला. 'कभी खुशी कभी गम'नंतर रिलीज झालेल्या 'मैं हूं ना' सिनेमात फराह खानला हृतिक रोशनला शाहरुखचा धाकटा भाऊ म्हणून कास्ट करण्याची इच्छा होती.
हृतिक रोशनने फराह खानची ऑफर नाकारली आणि त्यानंतर झाएद खान ही व्यक्तिरेखा साकारली. हृतिक रोशन त्यावेळी कोणत्याही मल्टीस्टारर सिनेमात काम करण्याची इच्छा नव्हती. असेही म्हटले जाते की हृतिकला हा सल्ला वडील राकेश रोशन यांनी दिला होता. जायद खानने 'मैं हूं ना' च्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय दिला होता.
शाहरुख खानशिवाय सुष्मिता सेन, जायद खान, अमृता अरोरा, किरण खेर, सतीश शहा, बमन इराणी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या आणि 'मै हूं ना' सिनेमातून फराह खान दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. त्यानंतर फराह खान आणि हृतिक रोशनने एकत्र काम केले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच बातमी मिळाली होती की हृतिक रोशनने फराह खानच्या दिग्दर्शनात एका जाहिरातीचे शूट केले आहे.